अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या प्रयत्नाने आयुर्वेदिक चिकित्सालय पुन्हा सुरु

*डॉ. प्रज्ञा मेश्राम यांचे बंद करण्यात आलेले आयुर्वेदिक चिकित्सालय आज *मा. अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या प्रयत्नाने पुन्हा सुरू करण्यात आले.*

कामठी : उत्तर नागपूर येथील डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या आयुर्वेदिक काढा मुळे मोठया प्रमाणात कोरोना संक्रमित झालेले रूग्ण कोरोना मुक्त होत असतांना महानगर पालिका यांनी कोणत्याही प्रकारची पुर्व सुचना न देता अचानकपने डॉ. प्रज्ञा मेश्राम यांचे चिकित्सालय बंद करण्याचे आदेश 14/04/2021 रोजी दिले होते. त्यामुळे हजारोंच्या संख्येने लाभ घेणारे कोविड संक्रमित रूग्ण या औषधि पासुन वंचित झाले होते.


डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या वर अन्याय झाल्याचे लक्षात येताच माजी राज्यमंत्री मा. अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी पुढाकार घेवून महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांच्या सिविल लाईन येथील कार्यालयात भेट घेतली व डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या आयुर्वेदिक औषधीमुळे पंन्नास हजाराहून अधिक कोविड रूग्ण बरे झाले असल्यामुळे हे आयुर्वेदिक चिकित्सकालय परत सुरू करण्याची परवानगी दयावी अशी महापौरांना विनंती केली. चर्चे दरम्यान वर्तमान परिस्थितीत मेडीकल, मेओ, एम्स सारख्या शासकीय रूग्णालय तसेच खाजगी रूग्णालयात सुध्दा बेड उपलब्ध नाहीत व वैक्सीनचा सुध्दा पुरवठ्याचे प्रमाण कमी झालेले आहे. अश्या परिस्थितीत नागपुर जिल्हयातील दररोज पाच हजारावरून अधिक नागपुर जिल्हयातील लोक संक्रमित होत आहेत व दररोज पंन्नास हून अधिक लोक या कोरोनामुळे मृत्यु मुखी पडत आहेत. हे सर्व लक्षात घेता अतिशय गरीब लोकांना 200 ते 250 रूपयांमध्ये डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या आयुर्वेदिक काढयाने कोविड रूग्ण बरे होत असतील तर त्यांचे आयुर्वेदिक चिकित्सालय त्वरित सुरू करण्याची परवानगीसह डॉ. प्रज्ञा मेश्राम यांना महानगर पालिकेनी पुर्ण सहकार्य व संरक्षण दिले पाहीजे असे मत महापौर यांच्या कडे मा. अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी व्यक्त केले. या वरून महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी डॉ. प्रज्ञा मेश्राम यांचे आयुर्वेदिक चिकित्सालय पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली व डॉ. प्रज्ञा मेश्राम यांना सहकार्य व संरक्षण देण्यात येईल असे आश्वासन दिले.
डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या विनंती वरून आज मा. अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी ऊत्तर नागपूर येथील डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या आयुर्वेदिक चिकित्सालयाला भेट दिली.
या प्रसंगी डॉ. प्रज्ञा मेश्राम व युवराज मेश्राम यांनी *अँड. सुलेखाताई कुंभारे* यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करून आभार मानले. या वेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या लोकांनी आनंद व्यक्त करून जयघोष केला. या वेळी बरिएमं चे जिल्हाध्यक्ष संदीप कांबळे, अशोक नगरारे, रत्नमाला मेश्राम, आनंद नाईक, सुभाष सोमकुवर, दिपंकर गणविर, उदास बंसोड, नागसेन चोखांद्रे, हेमराज टेंभुर्णे, व मोठया संख्येने कार्यकर्ते व लोक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

अवैध एलपीजी गॅस सिलेडंर चालवायचा ऑटो : आरोपीस अटक

Sun Apr 18 , 2021
अवैध एलपीजी गॅस सिलेडंर चालवतो ऑटो नागपुरः एलपीजी सिलेंडरच्या गॅस ऑटोमध्ये अवैधरीत्या भरणारा युवकाला शांतीनगर पोलिसांनी खाक्या दाखवत सापडा रचुन अटक केली. घरात मिनी वर्कशॉप उघडुन तो अवैधरीत्या गोरखधंधा करत होता. घटना शेख वसीम शेख हनीफ (35) मस्के ले-आउट, कावरापेठ आहे. पो.उपनिरीक्षक अरूण यादवराव बकाल, पोलिस स्टेशन शांतीनगर यांना गुप्त […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta