तेजस बहुउद्देशीय संस्था द्वारे कन्हान सत्रापुर च्या गरजु अपंगाला कपड़े व अन्नदान
#) तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी चा सेवाभावी कौतुकास्पद उपक्रम.
कन्हान : – तेजस संस्था कामठी व्दारे परिसरातील दात्याकडुन गहु, तांदुळ गोळा करून अंपग, गरिब, निराधार, गरजु लोकांना कपड़े व अन्नधान्य दान या उपक्रमांतर्गत कन्हान सत्रापुर येथील अंत्यत गरजु , अपंग, लोकांना गहु, तांदुळाचे अन्न धान्य व अरगुलेवार कडुन नवीन कपड़े, टॉवेल दान करण्यात आले. डिसेंबर २०२० ला कामठी येथे सग्या दोनही बहिनी चा भुकेने व्याकुळ होऊन घरीच मुत्यु झाला होता. अशी दुर्दैवी घटना भविष्यात कधी घडु नये या ची दखल घेत तेजस बहुउद्देशिय संस्था कामठी व्दारे दान दाते संस्थेचे वरिष्ठ मार्गदर्शक महेन्द्रजी भुटानी, नवीन पोस्टे चे पोलीस निरीक्षक विजय मलाचे, वरिष्ठ मार्गदर्शक सुनील चोखारे, सहयोगी सीए शिल्पी टिड वाल, बबलु तिवारी, राजु अग्रवाल, अशोक धबोड़कर, निर्मल दवानी, मनोज बत्रा, विजय कोंडुलवार, सागर मदनकर, संदीप यादव, अजय आकरिया, शुधोधन पाटिल, प्रमोद टेंबुरनिकर, प्रविण शर्मा बुट्टीबोरी, रहीम शेख, चंद्रशेखर अरगुलेवार व्दारा गहु, तांदुळ गोळा करून अंपग, गरिब, निराधार गरजु लोकांना अन्नधान्य दान “भुकेल्यास एक मुठ अन्न आपले ” या उपक्रमाचा साईमंदीर कामठी-कन्हान येथे दि.२६ जानेवारी २०२१ ला शुभारंभ करून फेब्रुवारी पासुन दर महिन्याच्या ३ तारखेनंतर गरजुकडे जावुन अन्नधान्य दान करणे निय मित सुरू आहे. यांच उपक्रमांतर्गत दि. ४,६, व ७ जुन २०२१ ला कामठी च्या अंपग, गरिब, निराधार गरजु लोकांना अन्नधान्य दान केले. चंद्रशेखर अरगुलेवार यांचे वडीलांचा (दि.५) मुत्यु झाल्याने त्या तरिखला अन्नधान्य वाटप न करता (दि.१६) सत्रापुर येथे तेजस संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार, उपाध्यक्ष देवी दास पेटारे, दीपचंद शेंडे, सदस्य मिस्बाहऊर रहमान , नरेंद्र शिंदे, सेवक शिंदे, सुभाम केवट, सुनील केवट, ट्रेनीज भारती कनोजे, उत्कर्ष कोचे, शीतल चौधरी, अभय पेटारे, अरुण भुते, राधेश्याम, उमेश, सोहेल शेख आदीच्या उपस्थितीत निराधार, गरीब गरजुना तेजस संस्थेचे अध्यक्ष व पदाधिका-यांचे हस्ते कपडे व १०-१० किलो गहु, तांदुळाचे अन्न धान्य वाटप करण्या त आले. तेजस संस्थेच्या ” भुकेल्यास एक मुठ अन्न आपले “या अंपग, गरजु नागरिकांना दर महिन्याला वितरण करित तेजस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार यांचे सेवाभावी हाथ सदैव मानवते करिता प्रर्यंत्नशिल आहे.