डॉ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वृत्तपत्र विक्रेता दिवस म्हणुन साजरा  

डॉ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वृत्तपत्र विक्रेता दिवस म्हणुन साजरा

कन्हान : –  देशाचे माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस कन्हान वृत्तपत्र विक्रेता व्दारे वृत्तपत्र विक्रेता दिवस म्हणुन साजरा करण्यात आला. 

     दिनाक १५ ऑक्टोंबर २०२० ला नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील  नगरपरिषद सामोर हारगुडे बुक स्टाल येथे देशाचे माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला कन्हान वृत्तपत्र विक्रेता सुतेश मारबते, श्रीधर केशट्टीवार, एन एस मालविये, मोहीत वतेकर, दिगांबर हारगुडे हयानी पुष्पहार, पुष्प अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी देशाकरिता व समाजाकरिता डॉ अब्दुल कलाम यांनी केलेल्या महान कार्याची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. दर रोज पहाटे सकाळी घरोघरी दैनिक वृत्त पत्र वितरण करण्या-या मुलांना नोटबुक व पेन वितरण करून सर्व वृत्तपत्र विक्रेतांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुतेश मारबते यांनी तर आभार नरेश बिसने यानी व्यकत केले. याप्रसंगी चंद्रशेखर भिमटे, धंनजय कापसीकर, कैलास सोनी, दिनेश नानवटकर, विवेक पाटील, पुथ्वीराज वासे, योगेश बर्वे, राजेश गायधने, अकुंश उताणे, गोविंद मारबते, निलेश बर्वे आदी उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान ला नविन एका रूग्णाची भर  : कोरोना अपडेट

Sun Oct 18 , 2020
कन्हान ला नविन एका रूग्णाची भर  #) कन्हानची एक महिला रूग्ण आढ ळुन कन्हान परिसर ८३१ रूग्ण.    कन्हान : –  कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असुन प्राथमिक आ रोग्य केंद्र कन्हान व्दारे रॅपेट १० संशयि ताच्या चाचणीत सर्व निगेटिव्ह (दि.१६) च्या १० स्वॅब चाचणीत कन्हानची एक महिला रूग्ण आढळुन कन्हान परिसर […]

You May Like

Archives

Categories

Meta