गोंडेगाव खदान खाजगी कंत्राटदारानी स्थानिय युवकाना रोजगार द्या.
कन्हान : – युवक कॉग्रेस पारशिवनी तालुका महासचिव साहिल गजभिये यांच्या नेतुत्वात गोंडेगाव येथे बैठक घेऊन वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा खदान येथे खाजगीकरणा अंतर्गत कोळसा खदानचे बहुतेक कामे खाजगी कंत्राटदार मंडळी करित आहे. या खाजगी कंत्राटदारांनी गावातील बेरोजगार युवकाना रोजगार देण्या बाबत चर्चा करून स्थानिय युवकाना रोजगार देण्याची सर्वानुमते मागणी करण्यात आली.
याप्रसंगी कृउबासं पारशिवनी संचालक सिताराम भारद्वाज, गोंडेगाव सरपंच नितेश राऊत, रामभाऊ ठाकरे, माजी उपसरपंच दिनेश रंगारी, प्रणय खवले, विवेक दळणे, सोनु पाटील, विवेक मेश्राम, अक्षय मस्के, शुभम पाटील, आशिष नागदेवे, प्रविण जगताप, गौरव गजभिये, अमन पाहाडे, धिरज गजभिये, पवन गजभिये, अनिल सहारे, सुनील सहारे, अरविंद सहारे, अजित भारसाकरे, मनोज गोंडाने, कोमल कुंभलकर, दशरथ ठाकरे, रूपेश गजबे, विनोद ठाकरे, मंगेश चच्चाने सह ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती.