स्थागुअशा नागपुर (ग्रा) पथकाने कोळश्या सह ट्रक चोरी केलेला पकडला

स्थागुअशा नागपुर (ग्रा) पथकाने कोळश्या सह ट्रक चोरी केलेला पकडला

# ) ट्रक, २५ टन कोळसा पकडुन १० लाखाचा मुद्देमाला सह १ आरोपीस अटक, १ फरार.

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री बस स्टॉप येथुन अज्ञात चोरट्यांनी कोळश्याचा भरलेला ट्रक सह एकुण दहा लाख रूप याचा मुद्देमाल चोरून नेल्याची कन्हान पोस्टे ला तक्रार दाखल असल्याने स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण पथकाने शोध लावुन मनसर समोर ४ किमी अंतरावरून कोळसा जप्त केला तर रामटेक चारगाव रोड वर रिलायन्स पेट्रोल पम्प मागुन ट्रक पकडुन कन्हान पोलीस स्टेशन च्या स्वाधिन करण्यात आला असुन पुढील तपास कन्हान पोलीसानी एका आरोपीस अटक केली तर एक आरोपी फरार आहे.


प्राप्त माहिती नुसार शनिवार (दि.१५) जानेवारी २०२२ ला रात्री ८ वाजता दरम्यान ट्रक मालक राम प्रसाद नागोजी पारधी वय ५४ वर्ष राह. वार्ड क्र.६ शंकर नगर कांद्री कन्हान यांच्या ड्रयव्हर ने कोळश्याने भरलेला ट्रक क्र. एम एच ४० ए के २४१९ शेंद्री व पिव ड्या रंगाचा असुन इंदर खुली कोळसा येथुन कोळसा भरून महाराजा प्रोसेसर इडस्ट्रीयल इस्टेट बुरहानपुर (मध्यप्रदेश) येथे जाण्याकरिता आशापुरा आरा मशिन कांद्री बस स्टॉप जवळ उभा करून ट्रक मालक व ट्रक ड्रायव्हर हे ट्रक ला लाॅक करून घरी निघुन गेले. दुसऱ्या दिवशी रविवार (दि.१६) जानेवारी २०२२ ला सकाळी ५:३० वाजता दरम्यान ट्रक चालक हा ट्रक घेवुन जाण्याकरिता ट्रक जवळ गेला असता ट्रक क्र. एम एच ४० एके २४१९ हा दिसला नसल्याने ट्रकमालक रामप्रसाद नागोजी पारधी यांच्या तोंडी तक्रारीवरून कन्हान पोस्टे ला ८ लाख ५० हजार रू चा ट्रक व २५ टन कोळशा १लाख ५० हजार रू एकुण १० लाख रूपयाच्या मुद्देमाल चोरी केल्याने अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केल्याने स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण पथकाने म्हणजे ४८ सोमवार (दि.१७) ला रात्री तासात शोध लावत राष्ट्रीय चारपदरी महामार्ग मनसर समोर ४किमी वर कोळसा जप्त केला तर रामटेक चारगाव रस्त्यावर रिलायन्स पेट्रोल पम्प मागुन ट्रक पकडुन १० लाखा चा मुद्देमाल कन्हान पोलीसां च्या स्वाधिन केले.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण पथकाचे सपोनी अनिल राऊत, हेकॉ विनोद काळे, ज्ञानेश्वर राऊत, नापोशि शैलेश यादव, प्रणय बनाफर, विरेंद्र नरड, साहेबराव बिहाडे व सुधिर चव्हाण यांनी शिताफीतीने करित कन्हान पोली साच्या ट्रक व कोळसा स्वाधिन केले. यातील आरोपी १) संजु अशोक काथोटे २) लाला यादव फरार अस ल्याने कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोस्टे पोसनि महादेव सुरजुसे व कन्हान गुन्हे पथकांचे राहुल रंगारी , सुधिर चव्हाण हयांनी आरोपी १) संजु अशोक काथोटे वय ३५ वर्ष राह वेकोलि टेकाडी नविन वसाहत यास अटक करण्यात यश आले तर २) आरोपी लाला यादव फुकट नगर कांद्री हा फरार आहे. पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कोलार नदीच्या डोहात आढळला मृतदेह

Wed Jan 19 , 2022
कोलार नदीच्या डोहात आढळला मृतदेह  सावनेर :  मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका युवकाचा नंदाजी बाबा देवस्थान हेटी परिसरातील कोलार नदीच्या डोहात मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास उघडकीस आल्याने खळबळ उडाली . उत्तम बंडू वाघ ( वय ३२ , पानउबाळी , ता . कळमेश्वर ) असे […]

You May Like

Archives

Categories

Meta