जुनिकामठी येथे अवैद्य रेतीचोरी करणारा बोलोरो पिकअप सह आरोपीस पकडले.
#) कन्हान पोलीसांची कारवाई ४ लाख २ हजार रू चा मुद्देमाल जप्त.
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत जुनिकामठी येथे कन्हान पोलीसांनी पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीसांनी सापाळा रचुन जुनिकामठी ग्राम पंचायत जवळ अवैध रेती चोरून नेताना बोलोरो पिकअप वाहन पकडुन आरोपी चालकाच्या ताब्याती ल बोलरो पिकअप वाहन व एक ब्रास रेती असा एकुण चार लाख दोन हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करित कारवाई करण्यात आली.
प्राप्त माहिती नुसार सोमवार (दि.१७) मे २०२१ ला सकाळी ७:४५ ते ८:१५ वाजता दरम्यान कन्हान पोलीस स्टाफसह पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय बातमी मिळाल्याने पोलीसानी जुनिकामठी येथे सापळा रचुन एक बोलोरो पिकअप चारचाकी वाहन क्र. एम.एच. ३५. ए जे ०१७७ ला पकडुन त्यातील रेती बाबद चालक / मालक सुदांशु धनपाल मेश्राम वय २३ वर्ष रा. जुनिकामठी यास विचारपुस केली असता त्याने कन्हान नदीच्या पात्रातुन जुनिकामठी घाटातुन रेती बिना राॅयल्टी चोरून आणल्याचे निष्पण झाल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला आणुन सरकार तर्फे फिर्यादी पोशि सुधीर चव्हाण यांचे तक्रारीवरून आरोपी सुदांशु धनपाल मेश्राम याचे ताब्यातील बोलो रो पिकअप चारचाकी वाहन किंमत ४ लाख व अर्धा ब्रॉस रेती किंमत २ हजार रू असा एकुण चार लाख दोन हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी सुदांशु मेश्राम विरूध्द अप क्र १४२/२०२१ कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून कारवाई करण्या त आली. सदर कारवाई कन्हान पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशन गुन्हे शाखा निरीक्षक श्री कदम, सफौ येशु जोसेफ, नापोशि कृणाल पारधी, राजेंन्द्र गौतम, राहुल रंगारी, पोशि संजय बदोरिया, सुधीर चव्हाण, मुकेश वाघाडे, सुशिल तट्टे, संदीप गेडाम आदीने शिताफितीने यशस्विरित्या पार पाडली.