निवृत्ती वेतनाअभावी त्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ

*निवृत्ती वेतनाअभावी त्या शिक्षकावर उपासमारीची वेळ.*

*वित्त विभागाच्या चुकीमुळे थांबले एका निवृत्त शिक्षकाचे पेंशन*

*कन्हान*:नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती पारशिवनी मधून सेवानिवृत्त झालेले अशोक गुलाबराव पवार हे जिल्हा परिषद वित्त विभागाच्या चूकीच्या कार्यपद्धतीमुळे गेल्या सहा महिन्यापासून निवृत्तीवेतनापासून वंचित आहेत याबाबत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष धनराज बोडे व सरचिटणीस विरेंद्र वाघमारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निवेदन दिले….

     श्री.पवार हे 31 ऑगस्ट 2019 रोजी नियत वयोमानानुसार पंचायत समिती पारशिवनी मधून सहायक शिक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले.ऑक्टोबर 2020 पर्यंत पारशिवनी पंचायत समिती मधून निवृत्तीवेतन घेत होते.त्यांचे मुळ गाव तळेगाव ठाकुर तालुका तिवसा जिल्हा अमरावती येथील असून सध्या ते त्यांच्या मुळ गावी तळेगाव ठाकुर पं.स.तिवसा येथे वास्तव्याने राहत आहे त्यामुळे त्यांनी निवृत्तीवेतन पं.स.तिवसा जिल्हा अमरावती येथे स्थानांतरीत करण्याची विनंती केली होती त्यानुसार त्यांचे निवृत्तीवेतन प्रकरण व निवृत्तीवेतन विषयक लाभाचे मंजूरी आदेश ,पीपीओ,(अ व ब) 12 डिसेंबर 2021 ला पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा परिषद अमरातीला पोस्टाद्वारे पाठविण्यात आले व त्याची एक प्रत श्री पवार यांनाही मिळाली परंतू जिल्हा परिषद अमरावती येथे चौकशी केली असता गेल्या माहे डिसेंबर मध्ये पाठविण्यात आलेले निवृत्तीवेतन प्रकरण जिल्हा परिषद अमरावतीला प्राप्तच झाले नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली.नागपूर जिल्हा परिषद मध्ये चौकशी केली असता प्रकरण पाठविण्यात आले परंतू एवढे महत्वाचे आदेश रजिस्टर पोस्ट न करता साध्या पोस्टने पाठविण्यात आल्यामुळे सदर्हु डाक सध्या कोठे पडली आहे हे समजण्यास मार्ग नाही.वित्त विभागाच्या या दप्तर दिरंगाईचा फटका एका निवृत्त शिक्षकाला बसला.जवळचा होता नव्हता सर्व पैसा त्यांनी स्वगावी घर बांधण्यासाठी खर्च केला आणि अशातच गेल्या नोव्हेंबर 2020 पासून त्यांना निवृत्तीवेतन न मिळाल्यामुळे त्यांचे कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आली.सदर प्रकरणाबाबत तातडीने कार्यवाही करून  संबंधित शिक्षकाला न्याय देण्याची मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष धनराज बोडे सरचिटणीस विरेंद्र वाघमारे  सह शिक्षक नेते गोपालराव चरडे ,रामू गोतमारे सुनिल पेटकर,सुभाष गायधने,ज्ञानेश्वर वंजारी,आनंद गिरडकर,दिलीप जिभकाटे,आशा झिल्पे ,सिंधू टिपरे, अनिल पाटील,अर्जुन धांडे,संतोष बुधबावरे,अशोक हटवार,हरिश्चंद्र रेवतकर,तुषार चरडे,वसंत बलकी, मनोज बोरकर,महिपाल बनगैया,विलास वनकर,रमेश गाढवे,सी.एस.वाघ,

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कन्हान ला कोव्हिड केअर सेंटर चा शुभारंभ 

Wed May 19 , 2021
कन्हान ला कोव्हिड केअर सेंटर चा शुभारंभ  कन्हान : –   शहरात व परिसरात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असुन शहरात गोरगरीबांना पाहिजे तशी आरोग्य सेवा उपलब्ध होत नसल्याने नागरीकांच्या मागणीस संजीवनी कोव्हिड केअर सेंटर चे डायरेक्टर सौ. शितल मुकेश चौधरी व डायरेक्टर तुषार फडणवीस यांचा प्रयत्नाने डोणेकर सभागृह कन्हान येथे कोव्हिड केअर सेंटरचा […]

You May Like

Archives

Categories

Meta