सावनेर येथे बालाजी सेलिब्रेशन लॉन येथे कोविड सेंटर चे मंत्री केदार यांच्या हस्ते उद्घाटन

सावनेर : स्थानिक भालेराव हायस्कुल सामोरील बालाजी सेलिब्रेशन लॉन येथे श्री.गुरूकृपा हॉस्पिटल व डेडीकेटेड कोविंड हेल्थ सेंटरचे उद्घाटन पशु संर्वधन , दुग्ध विकास , क्रिडा व युवक कल्याण मंत्री मा . सुनील केदार यांच्या हस्ते पार पडले . यावेळी मंत्री केदार यांनी डॉक्टर व त्यांच्या चमुचे कौतुक करीत स्वतःचा जिव धोक्यात टाकून नागरिकांचे प्राण वाचविण्याचे महान कार्य करीत असल्याचे ते म्हणाले .

  50 बेडचे डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर हे आधुनिक सुविधायुक्त आहे . येथे ऑक्सीजन , मॉनिटर , असून पुढे पटांगणासह गार्डन अटॅच आहे . या ठिकाणी शासकिय दराप्रमाणे उपचार करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे . यावेळी जि.प. अध्यक्ष मा.रश्मी बर्वे , माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर कुंभारे , साहेबराव विरखरे , नगर कॉ.कमेटी अध्यक्ष पवन जयस्वाल , प्रशांत ठाकरे , श्रेयश देशमुख , डॉ . विक्रम राठी , डॉ . गिरीश ठाकरे , डॉ.प्रविण वाकोडे , डॉ . प्रितमकुमार निचत , डॉ.अजय कवाडे , डॉ.भुषण शेंबेकार , डाॅ. जयराज हाडके , डॉ.छत्रपती मानापुरे , डॉ.सुरेन्द्र गेडाम , डॉ . श्रद्धा मानापुरे , मनोज बसवार ,नगर सेवक लक्ष्मीकांत दिवटे, निलेश पटे ,दिपक बसवार ,सुनिल चापेकर, प्रा. डॉ. योगेश पाटील , चैतन्य ठाकरे , विक्रम गमे , नरेन्द्र पारवे , गजु कोमुजवार सह अनेक उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

"दुष्काळात तेरावा महिना " खंडाळा येथे विज पडुन शेतक-यांचा बैल ठार

Wed May 19 , 2021
खंडाळा येथे विज पडुन शेतक-यांचा बैल ठार.  कन्हान : – परिसरात आलेल्या अवकाळी वादळ, वारा, पाऊसा आल्याने खंडाळा (निलज) गावालगत असलेल्या कोठात विज पडुन बैल ठार झाल्याने खंडाळा (निलज) येथील शंकरराव वानखेडे या शेतक-याचे ऐन शेतीचा कामा च्या वेळी भंयकर नुकसान झाले आहे.          मंगळवार (दि.१८) ला […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta