प्राथमिक आरोग्य केंन्द्रात अँन्टी स्नेक वेनो इंजेक्शन उपलब्ध करण्याची मागणी

*प्राथमिक आरोग्य केंन्द्रात अँन्टी स्नेक वेनो इंजेक्शन उपलब्ध करण्याची मागणी* 

#) कन्हान शहर विकास मंच चे तहसीलदारांना निवेदन

कन्हान : – तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंन्द्रात गेल्या खुप दिवसा पासुन अँन्टी स्नेक वेनो इंजेक्शन उपलब्ध नसल्याने तसेच नागरिकांना साप , विंचु सारखे सरपटणारे प्राणी चावल्याने किती तरी लोकांचा मृत्यु झाल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी मंच उपाध्यक्ष रुषभ बावनकर यांच्या नेतृत्वात तहसीलदार वरुण कुमार सहारे यांची भेट घेऊन व त्यांना एक निवेदन देऊन तात्काळ तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंन्द्रात अँन्टी स्नेक वेनो इंजेक्शन उपलब्ध करण्याची मागणी केली आहे .

      पारशिवनी तालुक्यात , व परिसरात मोठ्या प्रमाणात शेती होत असुन या तालुक्यात  आरोग्य सेवा देणारे प्राथमिक आरोग्य केंन्द्रात अँन्टी स्नेक वेनो इंजेक्शन उपलब्ध करने अत्यंत गरजेचे झाले आहे . पावसाळ्या चे दिवस सुरू झाले असुन जमिनीत व शेतीमध्ये पाणी जमा होऊन जमिनीखाली व बिळात असणारे साप , विंचु सारखे मोठ मोठे सरपटणारे प्राणी मोठ्या प्रमाणावर बाहेर निघत अचानक शेतकऱ्यांना चावा घेत असतात त्यामुळे साप, विंचु चावलेल्या रूग्णांना वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने लोकांचा मृत्यु होत असल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी मंच उपाध्यक्ष रुषभ बावनकर यांच्या नेतृत्वात तहसीलदार वरुण कुमार सहारे यांची भेट घेऊन व त्यांना एक निवेदन देऊन तात्काळ तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंन्द्रात अँन्टी स्नेक वेनो इंजेक्शन उपलब्ध करण्याची मागणी केली आहे .

या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच उपाध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , कोषाध्यक्ष हरीओम प्रकाश नारायण , सदस्य शाहरुख खान , सुषमा मस्के , पौर्णिमा दुबे , सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .


*तात्काळ उपलब्ध करु – तहसीलदार वरुण कुमार सहारे*

कन्हान शहर विकास मंच चे पदाधिकारी मंच उपाध्यक्ष रुषभ बावनकर यांच्या नेतृत्वात तहसीलदार वरुण कुमार सहारे यांना तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंन्द्रात अँन्टी स्नेक वेनो इंजेक्शन उपलब्ध करण्याचा मागणी करिता त्यांचा कार्यालयात गेले असता तहसीलदार वरुण कुमार सहारे यांनी निवेदनाची दखल घेत तात्काळ तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत वाघ साहेबांना फोन लावुन   अँन्टी स्नेक वेनो इंजेक्शन बाबत विचारले असता त्यांनी उपलब्ध असल्याचे सांगितल्याने आणखी स्टाॅक वाढवुन तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंन्द्र येथे अँन्टी स्नेक वेनो इंजेक्शन वाटक करण्याचे निर्देश दिले आहे .

कन्हान शहर विकास मंच च्या निवेदनाची तहसीलदार वरुण कुमार सहारे यांनी तात्काळ दखल घेतल्याने मंच च्या पदाधिकार्यांनी तहसीलदार वरुण कुमार सहारे यांचे आभार व्यक्त केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

वृध्दाश्रम मे मनाया सावनेर माहेश्वरी संगठन ने महेश नवमी उत्सव  

Sun Jun 20 , 2021
वृध्दाश्रम मे मनाया सावनेर माहेश्वरी संगठन ने महेश नवमी उत्सव     सावनेर : महेश नवमी की पूजा सभी लोगो ने होम हवन पूजा अर्चना करके सभी समाज बंधुओ ने घर पे ही मनाई। आज २०/०६/२०२१ को सावनेर वृद्धाश्रम में श्री राज जी चांडक, रविंद्र चांडक जी, नबिरा जी नागपुर। इनके […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta