स्वातंत्रता संग्राम सेनानी “लाहनाबाई लक्ष्मण खडसे” यांना देवाज्ञा

  • स्वातंत्रता संग्राम सेनानी “लाहनाबाई लक्ष्मण खडसे” यांना देवाज्ञा

*शासकीय इतमामात अंतविधी*

*तहसिल व पोलीस प्रशासनाने दिली मानवंदना*

सावनेरः शहरातील दिवंगत स्वातंत्रता संग्राम सेनानी यांच्या धर्मपत्नी लहानाबाई यांचे वुध्दकपाळामुळे देहावसन झाले त्यांचे वय 105 वर्षाचे असुन आपल्या जिवनात त्यांनी आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेतली परंतु आखेरच्या क्षणाला प्रकु्ती खालावल्या त्यांनी दि.15 सप्टेंबर रोजी आखेरचा श्वास घेतला.
देशाच्या स्वतंत्र आंदोलनात आपले पती लक्ष्मण खडसे यांच्या खांद्याला खांदा देऊण इंग्रजी राजवटीच्या विराधात आपल्या जिवाची पर्वा नकरता देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासोबतच महात्मा गांधी यांच्या सोबत मीठ सत्याग्रहात ही यांच्या मोठा सहभाग होता.नगरितील वयोवृद्ध स्वतंत्रता संग्राम सेनानी ची निधनवर्ता कळताच नगरित हळहळ व्यक्त करण्यात येत असुन अनेक शासकीय अधिकारी व गणमान्यांनी त्यांचे निवासस्थानी पोहचून मु्तात्म्यास मानवंदना वाहीली

*लहानाबाई या मातंग समाजातून येत असल्या तरी देश हिताकरीता त्यांचे कार्य व त्याग जितके मोठे असले तरी त्याचा त्यांनी कधिही अभिमान केला नाही.गोरगरीब कुटुंबातील असंख्य गरोदर मातांना त्यांनी नेहमीच ममत्वाचा हात देत त्यांच्या सुखदुःखात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहून दिनदुबड्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच मातंग समाजाच्या उत्थानाकरिता त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. देश व समाजासाठी सतत धडपडणारे अष्टपैलू वटवृक्ष लहानाबाई खडसे आज आपणास या नश्वर संसारात सोडून देवाघरी गेल्या.

*शासकीय इतमामात अंतविधी*

*स्वतंत्र संग्राम सेनानी लहानाबाई यांचे पार्थीवाचे राम गणेश गडकरी स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांचे पुत्र निळकंठ खडसे यांनी मुखाग्नी देऊण अंतविधी करण्यात आल। तत्पूर्वी सावनेर पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक अशोक कोळी व त्यांचे सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करुण शासनातर्फे मानवंदना व श्रध्दांजली दिली.याप्रसंगी नगरितील अनेक गणमान्यांनी लहानाबाई यांचे जिवनावर प्रकाश टाकत श्रध्दांजली अर्पण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

नागपूर ब्रेकिंग.. किल्ले-कोलार नदीत बुडून तीन तरुणांना मृत्यु

Sat Sep 19 , 2020
नागपूर ब्रेकिंग… सावनेर : नागपूर जिल्ह्याच्या दहेगाव रंगारी गावाशेजारी असलेल्या किले-कोलार नदीत बुडून तीन तरुणांना मृत्यु, शंतनू एडकर (वय 20), अर्चित एजवान (वय 20) आणि आकाश राऊत (वय 25) अशी बुडालेल्या तरुणांची नाव असुन नदीत कुटुंबासोबत राख शिरवायला गेलेल्या तीन तरुणांचा बुडून मृत्यु, एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात तिघंही बुडाले, रेस्क्यू टिम […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta