घरगुती व सार्वजनिक गणपतीचे काली मंदिर नदी काठावर विसर्जन करावे – करूणाताई आष्टनकर 

घरगुती व सार्वजनिक गणपतीचे काली मंदिर नदी काठावर विसर्जन करावे – करूणाताई आष्टनकर 

#) काली मंदिर कन्हान नदी पात्रात ढिवर समाज संघटनच्या पथका व्दारे श्री गणेश मुर्ती विसर्जन.  


कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात गणेश महोत्स व मोठया जल्लोषात साजरा करण्यात येतो. परंतु राज्या सह नागपुर जिल्ह्यात व ग्रामीण भागात मागील दोन वर्षापासुन कोरोनाचे सावट असल्याने शहरातील परिसरात शासनाच्या नियमाचे पालन करूनच श्री गणेश उत्सव साजरा करून कन्हान-पिपरी नगरपरिष दे द्वारे काली मंदिर कन्हान नदी काठावर श्री गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आल्याने घरघुती व सार्वजनिक गणपती विर्सजन करावे असे कडकडीचे आवाहन नगरपरिषद नगराध्यक्षा करूणाताई आष्टन कर यांनी नागरिकांना केले आहे.

        कन्हान शहरात व परिसरात शुक्रवार (दि.१०) सप्टेंबर ला श्री गणेश चतुर्थी च्या दिवशी बाप्पाची घरो घरी ६१४ व सार्वजनिक शहर ४ आणि ग्रामिण १४ श्री गणेशाची स्थापना करून सकाळी व सायंकाळी होणा ऱ्या आरती शिवाय कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन न करता कोरोना काळातील शासनाच्या नियमाचे पाल न करूनच शहरात व परिसरात गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे. जिल्ह्यात व शहरात गेल्या काही दिवसापासुन सतत पाऊस होत असल्याने कन्हाननदी दुथडी भरुन वाहत असल्याने येणाऱ्या रविवार (दि.१९ ) व सोमवार (दि.२०) सप्टेंबर ला गणेश विसर्जनाच्या पुर्व नियोजन करण्याकरिता नगरपरिषद व कन्हान पो लीस प्रशासनाने सोमवार (दि.१३) सप्टेंबर ला काली मंदिर नदी काठावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. असुन मंगळ वार (दि.१४) सप्टेंबरला कन्हान-पिपरी नगरपरिषद येथे नगराध्यक्षा करूणाताई आष्टनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन आगामी रविवार (दि.१९) व सोमवार (दि.२०) सप्टेंबर दोन दिवस काली मंदिर सत्रापुर कन्हान नदी काठावर नगरपरिषद द्वारे गणेश विसर्जनाकरिता विधृत (लाईटस), कुत्रिम टैंक, ढिवर समाज संघटनाचे पथक व संपुर्ण व्यवस्था करण्यात आल्याने शहर व परिसरातील नारिकांनी घरघुती व सार्वजनिक श्री गणेश मुर्तीचे काली मंदिर कन्हान नदी काठावर विर्सजन करावे. असे कडकडीचे आवाहन नगराध्यक्षा करूणाताई आष्टनकर हयांनी केले आहे.  बैठकीस ढिवर समाज संघटन अध्यक्ष सुतेश मारबते, राजु मारबते, मोहन वाहिले, रेखा भोयर, बंडुजी केवट,  धर्मराज खंटाटे, रवि केवट, सामाजिक कार्यकर्ता प्रशांत मसार, डेकोरेशन व्यवस्थापक महादेव लिल्हारे, अजय चव्हान, प्रदीप गायकवाड  सह नप अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

घरगुती व सार्वजनिक गणपतीचे विसर्जन कडेकोर पोलीस बंदोबस्तात

Mon Sep 20 , 2021
* घरगुती व सार्वजनिक गणपतीचे विसर्जन कडेकोर पोलीस बंदोबस्तात * गणपती विर्सजन शांतात पूर्वक वातावरणात * नदी पात्रात ढिवर समाज संघटनच्या पथका व्दारे श्री गणेश मुर्ती विसर्जन.   कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात गणेश महोत्सव मोठया जल्लोषात साजरा करण्यात येतो. परंतु राज्या सह नागपुर जिल्ह्यात व ग्रामीण भागात मागील दोन वर्षापासुन कोरोनाचे […]

You May Like

Archives

Categories

Meta