बनपुरी येथे ग्राम संपर्क अभियानाचे आयोजन : पंजाब नॅशनल बॅकेचा उपक्रम

*बनपुरी येथे ग्राम संपर्क अभियानाचे आयोजन
*पंजाब नॅशनल बॅकेचा उपक्रम बनपुरी गावात

कन्हान ता.19 ऑक्टोबर
पारशीवनी तालुक्यातील बनपुरी या गावात पंजाब नॅशनल बॅंक ,कन्हानच्या वतीने आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत ग्रामपंचायत बनपुरी येथे ग्राम संपर्क अभियानाचे नुकतेच आयोजन बनपुरीच्या ग्रामपंचायत आवारात पार पडले.
याप्रसंगी प्रबंधक गोपाल धोंगडी ,कृषी अधिकारी सचिन कसारे, श्रीमती स्वेता पटले, सरपंच संजय गजभिये, अशुतोष रामटेके यांची प्रमुख उपस्थिती होती. कन्हान शहरापासून बनपुरी गाव दहा ते बारा किलोमिटर अंतरावर असल्याने सामान्य जनतेला त्रास होतो. बॅक जनतेचा दारी यामताचे असणारे बॅक प्रबंधक धोंगडी यांनी बॅक तर्फे ग्राहकांना विविध योजनेचा अंतर्गत तेवीस लाखाचे कर्ज स्वीकृत करण्यात आले.

तसेच उपाययोजना विषयी माहिती दिली. पंतप्रधान विमा योजना, किसान क्रेडिट कार्ड, ट्रॅक्टर व इतर चारचाकी,दुचाकी वाहन खरेदी कर्ज ,शिक्षण कर्ज, गृहकर्ज, बॅकेचे ‘पंजाब वन’ अॅप व आदी विषयावर सविस्तर माहिती प्रधान केली.गावकर्यानी प्रत्यक्ष संवाद साधून समस्या मांडल्या. बॅकेचा वतीने सर्व शंका समस्यांचे निराकरण करण्यात आले. मंडल कार्यालय नागपूरचे कृषी अधिकारी यांचे हस्ते ग्राहकास स्वीकृत पत्र देण्यात आले. सचिन कसारे व स्वेता पटले यांनी बॅंकेचा अन्य योजने सोबत पेशन योजना ,आरोग्य बिमा योजना,अपघाती बिमा योजना आदी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना आशुतोष रामटेके यांनी केले तर आभार संरपच संजय गजभिये यांनी मानले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान ला नविन दोन रूग्णाची भर  : कोरोना अपडेट

Mon Oct 19 , 2020
कन्हान ला नविन दोन रूग्णाची भर  #) कन्हान १, कांद्री १ असे २ रूग्ण आढळुन कन्हान परिसर ८३५ रूग्ण.    कन्हान : –  कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ३९ संशयिताच्या रॅपेट व स्वॅब (आरटीपीसीआर ) चाचणीत दोन रूग्णाचा अहवाल पॉझीटिव्ह आल्याने कन्हान […]

You May Like

Archives

Categories

Meta