पाणी अडवा, पाणी जिरवा.” अंतर्गत श्रमदानाने साटक शेत शिवारात दोन वनराई बंधारे बांधले

पाणी अडवा, पाणी जिरवा.” अंतर्गत श्रमदानाने साटक शेत शिवारात दोन वनराई बंधारे बांधले. 

जाहिरातीसाठी 7020602961

कन्हान : – कृषी विभाग पारशिवनी तालुका व ग्रामस्थ शेतक-यांच्या सयुक्त विद्यमाने साटक शेतशिवारातील लेंडी नाला व हिवरा साटक नाल्यावर असे दोन वनराई बंधारे चे लोकसहभागातुन उभारण्यात आल्या ने परिसरातील शेतक-यांना शेती करिता लाभ होईल. 

      “पाणी अडवा, पाणी जिरवा.” योजना २०२०-२१ अंतर्गत कृषी विभाग पारशिवनी तालुका व ग्रामस्थ शेतक-यांच्या सयुक्त विद्यमाने गुरूवार (दि.१७) ला साटक येथील श्री किसन बापुराव हिंगे यांचे शेता लगत लेंडी नाल्यावर आणि हिवरा साटक नाल्यावर असे दोन लोकसहभागाने श्रमदानातुन वनराई बंधारे बांधण्यात आले. या बंधाऱ्यामुळे पावसाळ्यानंतर नाल्यातुन वाहूुन जाणारे पाणी पारंपारिक पद्धतीने अडवून ते पाणी जमिनीत जिरविण्यासाठी मदत होई ल. वनराई बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याने जवळपास च्या शिवारातील भूजल पातळी वाढूुन तलाव, विहिरीत जल पातळी वाढण्यास मदत होईल आणि सदर नाल्यालगत असलेल्या शेतकऱ्यांना पर्यायी सिंचनाची व्यवस्था होईल या हेतूने बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली. यामुळे साटक शेतशिवारातील २० ते २५ शेत क-यांच्या अंदाजे ६० ते ७५ एकर शेती करिता सिंचना चा शेतक-यांना लाभ होईल. याप्रसंगी साटक सरपंचा सौ सिमाताई यशवंतराव उकुंडे, उपसरपंच गजाननजी वांढरे, मंडळ कृषी अधिकारी कन्हान श्री. जी बी वाघ  , कृषी सहायक भालेराव, क्रिष्णा ठोंबरे, देशमुख, साठे , कु ढंगारे, कु राठोड, ग्रा प सदस्य तरूण बर्वे, नारायण कुंभलकर, मंगेश हिंगे, राजु चोपकर, आत्माराम उकुंडे , मंगेश भुते, रविंद्र गुडधे, रोशन चामट, रमेश वांढरे, उमेश भुते, अरूण लोंडे सह इतर ग्रामस्थ शेतक-यांनी श्रमदान करित सहकार्य केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

रामकृष्ण मठ व्दारे आदर्श हायस्कुल च्या गोरगरिब विद्यार्थ्यांना ब्लॉकिंट वितरण

Sat Dec 19 , 2020
रामकृष्ण मठ व्दारे आदर्श हायस्कुल च्या गोरगरिब विद्यार्थ्यांना ब्लॉकिंट वितरण कन्हान : – रामकृष्ण मठ धंतोली नागपुर च्या वतीने  कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या शासनाच्या नियमाचे पालन करित आदर्श हायस्कुल कन्हान च्या गोरगरिब विद्यार्थ्याना थंडी पासुन बचाव करण्याकरिता ब्लॉकिंट चे वितरण करण्यात आले.        शुक्रवार (दि.१८) ला आदर्श हायस्कुल सुरेश नगर […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta