*भिवापूर तालुक्यात “आपले सरकार सेवा प्रकल्प” , कोरोना काळात ठरला स्तुत्य उपक्रम*
भिवापुर : महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून प्रत्येक ग्राम पंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात आले होते . सदर प्रकल्प संपूर्ण पणे चालवण्याची जबाबदारी CSC कडे देण्यात आली होती . या केंद्रामधून ग्राम पंचायत स्तरावरील सर्व लेखे ऑनलाईन केली जातात तसेच गावातील नागरिकांना सेवा दिल्या जातात , नागरिकांना सर्व प्रमाणपत्र देणे महसूल विभागाच्या सेवा जातीचे प्रमाणपत्र ,उत्पन्न दाखला, डिजिटल ७/१२, ८अ देणे, बँकेच्या सेवा आधार बेस पेमेंट , केंद्र शासनाच्या विविध सेवांचे कार्ड काढून देणे , आयुष्यमान भारत,श्रम योगी मानधन,श्रम कार्ड, शेतकरी लोकांच्या सर्व योजनाच्या (महा डी बी टी, किसान मानधन) ऑनलाईन फार्म याच केंद्राच्या माध्यमातून देण्याचे काम ग्रामीण स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्र करीत आहे .
भिवापूर तालुक्यात ५६ ग्राम पंचायत मध्ये ५६ आपले सरकार सेवा केंद्र असून याचा कोरोना काळात लोकांना आधार बेस पेमेंट च्या माध्यमातून खूप फायदा झाला तसेच लासिकारणात खूप मोठा सहभाग केंद्र चालकांचा होता लसीकरण नोंदी ऑनलाईन करणे व दोन डोज पूर्ण झालेल्या व्यक्तींना प्रमाणप पत्रे देणे इत्यादी सेवा त्यालुक्यात ३६ केंद्र चालक देत आहे. आम्ही केंद्रचालक २०११ पासून शासनाच्या या प्रकल्पात काम करित आहोत .
शासनाच्या येणा-या नवीन सर्व योजनाचे फार्म भरून देणे तसेच गावातील नागरिकांचे सर्व ऑनलाईन कामे याच केंद्रामधून करून देत आहोत त्यामुळे छोट्या छोट्या कामाला लोकांना भिवापूर उमरेड या ठिकाणी जावे लागत नाही. पुन्हा जास्तीत जास्त सेवा देणे व गावातील नागरिकाचे सर्व कामे गावातच होईल हाच आमचा प्रयत्न आहे .
अमोल चौधरी
केंद्रचालक सेलोटी , भिवापुर