अवैधरित्या वाळु वाहतुक करणारा ट्रॅक्टर-ट्राॅली जप्त  ३,०३,००० रुपयांचा मुद्देमालासह वाळू व ट्रॅक्टरवर कारवाई 

अवैधरित्या वाळु वाहतुक करणारा ट्रॅक्टर-ट्राॅली जप्त

३,०३,००० रुपयांचा मुद्देमालासह वाळू व ट्रॅक्टरवर कारवाई

कन्हान,ता.१८ डिसेंबर

    मौजा टेकाडी शिवार येथे एक लाल रंगाचा ट्रॅक्टर आणि बिना नंबरची ट्राली कन्हान शहरातील रस्त्याने अवैधरित्या वाळू वाहतुक करतांना आढळून आल्याने पोलीसांनी एक ब्रास वाळू, ट्रॅक्टर सह एकुण ३,०३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    प्राप्त माहिती नुसार, ए.एस.आई सुर्यभान जळते शनिवार (दि.१७) डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता पासून ते रविवार (दि.१८) डिसेंबर रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव सुरजुसे, एनपीसी मंगेश आदि पोलीस कर्मचाऱ्या सह परिसरात पेट्रोलिंग करित असतांना मौजा टेकाडी शिवारात एक लाल रंगाचा स्वराज्य कंपनीचा ट्रक्टर व बिना नंबरची ट्रॉली कन्हान येथे टेकाडी रस्ताने जात असतांना मिळुन आला.        पोलीसांनी त्याला थांबवुन वाळू भरून दिसल्याने चालक यांना नाव, वय, गांव विचारले व वाळूची रॉयल्टी आणि ट्रॅक्टरचे कागदपत्र आहे का ? या बाबत विचारपुस केली. ट्रक्टर चालक याने आपले नाव प्रकाश मुलचंद उईके (वय ३५) रा.प्रभाग क्र ५ पिपरी – कन्हान. रॉयल्टी व प्रकाश याने ट्रक्टरचे कागदपत्र नसल्याचे सांगीतले. त्या वरून पोलीसांनी सदर ठिकाणी मौका जप्ती पंचनामा कार्यवाही करून मोक्या वरून एक ब्रास वाळू अंदाजे ३००० रु, एक विना नं. ट्रक्टर मुंडा व विना नं.ची ट्राॅली सह अंदाजे किंमत ३,००,००० रु. असा एकुण ३.०३.००० रु. चा माल मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्ती पंचनामा करुन मुद्देमाल जप्त करण्यात आला .

   सदर प्रकरणा बाबत ए.एस.आई सुर्यभान जळते यांच्या तक्रारी वरून आरोपी प्रकाश मुलचंद उईके‌, आकाश रमेश माहतो यांचा विरुद्ध कलम ३७९, १०९ आईपीसी अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात ए.एस.आई सुर्यभान जळते करीत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पाळण्याचा दोरीने लावला युवकाने गळफास 

Mon Dec 19 , 2022
पाळण्याचा दोरीने लावला युवकाने गळफास कन्हान,ता.१८ डिसेंबर     पोलीस स्टेशन हद्दीतील सत्रापूर येथे युवकाने मधल्या खोलीत असलेला फाट्याला बांधलेल्या पाळण्याचा दोरीने गळफास लावुन आत्महत्या केली.    प्राप्त माहितीनुसार, रविवार (दि.१८) डिसेंबर रोजी रात्री साळे बारा ते एक वा.च्या दरम्यान आई सौ.सुरेखा चंद्रभान बर्वे (वय-४८) रा.सत्रापुर, कन्हान पाणी पिण्याकरिता उठली. […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta