कल्पवृक्ष ट्री संस्थेतर्फे छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त वृक्षदान

नागपूर,ता.२० फेब्रुवारी
श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कल्पवृक्ष ट्री संस्थेतर्फे वृक्षदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये तुळशीचे रोप दान करण्यात आले.

तुळशीचे रोप दान करण्यामागे एकच उद्देश लोकांना वृक्ष लागवडीच्या कामासाठी प्रवृत्त करणे हा आहे. आज ज्या प्रकारे वृक्षतोड केली जात आहे, जंगले नष्ट केली जात आहेत, त्यामुळे येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी कल्पवृक्ष ट्री संघटनेने एक छोटेसे प्रेरणादायी पाऊल उचलले आहे.

हा उपक्रम दरवर्षी कल्पवृक्ष ट्री संघातर्फे आयोजित केला जातो. या वेळी कल्पवृक्ष संस्थेसह रायसोनी ग्रुप ऑफ कॉलेजेस नागपूर व झुलेखा कॉलेज नागपूर यांचे सहकार्य लाभले.यावर्षी ४०० तुळशी रोपांचे वृक्षदान करण्यात आले. हा कार्यक्रम कल्पवृक्ष ट्री संघाच्या सर्व सदस्यांनी घेतला.
Post Views: 386
Mon Feb 20 , 2023
शिवाजी महाराजांसारखे राजे होणे नाही-मुख्याध्यापक खिमेश बढिये धर्मराज प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी कन्हान,ता.२० फेब्रुवारी शिवाजी महाराजांनी आपल्या अजोड कर्तृत्वाच्या जोरावर स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या समोर नतमस्तक होण्याचा आजचा दिवस आहे. जवळजवळ चारशे वर्ष उलटल्यानंतर देखील शिवाजी महाराजांच्या नावाचं गारुड आजही मराठी मनावर कायम आहे. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची […]