शिवरायांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी तर्फे बाईक रॅली

शिवरायांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी तर्फे बाईक रॅली

कन्हान, ता.२० फेब्रुवारी

    छत्रपती शिवरायांच्या ३९३ वी जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी शाखा कन्हान तर्फे बाईक रॅली काढून थाटात साजरी करण्यात आली.

    वंचित बहुजन आघाडीचा सदस्यांनी तालुका वरिष्ठ पदधिकारी चंद्रमणी पाटील यांचा नेतृत्वात बाईक रॅली तुकाराम महाराज मंदिर, तुकाराम नगर पासून डॉ.आंबेडकर चौक येथे पोहचून संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण‌ केले. वंचित आघाडीचा युवकांनी छत्रपतींच्या नावाचा घोषणा देत शिवाजी नगर, येथील छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. संपूर्ण कन्हान शहरात‌ बाईक रॅलीने भ्रमन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर विचार प्रकट केले. कार्यक्रमाचे संचालन निशांत मोटघरे यांनी केले.‌ तर आभार प्रदर्शन रजनीश मेश्राम यांनी केले.स्वप्नील वाघधरे, चंद्रमणी पाटील, निशांत मोटघरे, अर्पित वाघमारे, शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो, अशा घोषणा दिल्या. यावेळी उपस्थित नितेश मेश्राम, मनोज गोंडाने,‌‌ सुशील कळमकर, अविनाश नागदेवे, रजनीश मेश्राम, सागर उके, सतीश ढबाले, योगेश मोहड, मनीष शंभरकर, राजेश सोमकुवर, सोनू खोब्रागडे, रितिक कापसे, रोहित राय, आदित्य टेभूरणे,‌‌ नवीन सहारे, अजय गाणार, विनय बागडे, सह अनेक कार्यकर्ते हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

खंडाळात रक्तदान, छत्रपतींच्या नावाचा जयघोष 

Mon Feb 20 , 2023
खंडाळात रक्तदान, छत्रपतींच्या नावाचा जयघोष कन्हान,ता.२० फेब्रुवारी      ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष करीत शीव गर्जनेसह शिवराय ग्रुप खंडाळा, विदर्भ भूमिपुत्र संघटनेच्या वतीने शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.छ       छ.शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला खंडाळा उपसरपंच चेतन कुंभलकर, सामाजिक कार्यकर्ता सुनिल लक्षणे‌ व शिवशंकर(चिंटु ) […]

You May Like

Archives

Categories

Meta