खंडाळात रक्तदान, छत्रपतींच्या नावाचा जयघोष 

खंडाळात रक्तदान, छत्रपतींच्या नावाचा जयघोष

कन्हान,ता.२० फेब्रुवारी

     ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष करीत शीव गर्जनेसह शिवराय ग्रुप खंडाळा, विदर्भ भूमिपुत्र संघटनेच्या वतीने शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.छ

      छ.शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला खंडाळा उपसरपंच चेतन कुंभलकर, सामाजिक कार्यकर्ता सुनिल लक्षणे‌ व शिवशंकर(चिंटु ) वाकुडकर यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.

      प्रसंगी गावातील तरुणांनी व शिवरायग्रुप खंडाळा, विदर्भ भूमिपुत्र संघटन, संवीधानीक संघटन कन्हान च्या सहयोगाने शासकीय रुग्णालय नागपुर च्या सहकार्यातून भव्य असा‌ रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात ३७ तरूणांनी रक्तदान केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता खंडाळा उपसरपंच चेतन कुंभलकर, सामाजिक कार्यकर्ता सुनिल लक्षणे, शिवशंकर (चिंटु ) वाकुडकर, श्यामभाऊ पुरवले, आशिष वानखेडे, आकाश राऊत, अनिल हटवार, स्वप्नील धरमारे, अरविंद उके, राजन मनघटे, कमल बावणेे, विलास चौधरी, सुजित गावडेे, विजय चौधरी व संपूर्ण गावकरी मंडळी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शहर युथ काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराजांच्या जीवनचरित्र्यावर प्रकाश 

Tue Feb 21 , 2023
शहर युथ काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराजांच्या जीवनचरित्र्यावर प्रकाश कन्हान,ता.२० फेब्रुवारी    शहर युथ काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिवाजी नगर, कन्हान येथील महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.       महाराजांचे प्रजेवर जितके प्रेम होते, तितकेच ते कर्तव्यकठोर होते. शेतकऱ्यांवर त्यांचे विशेष प्रेम होते. जानता […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta