कन्हान, साटक ला २५५ जेष्ठ नागरिकांनी कोरोना लस चा घेतला लाभ   

कन्हान, साटक ला २५५ जेष्ठ नागरिकांनी कोरोना लस चा घेतला लाभ   

#) प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान १४५ व साटक ११० अश्या २५५ नागरिकांना लस चा लाभ. 


कन्हान : – प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे ६० वर्षा वरील जेष्ट व दुर्धर आजाराच्या व्यकतीना कोरोना लस १४५ तर प्राथ. आरोग्य केंद्र साटक येथे ११० अश्या २५५ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस लावुन लाभ देण्यात आला असुन कोरोना रूग्णाची वाढत्या संख्ये वर अंकुश लावण्याकरिता शासनाच्या प्रतिबंधक उपा य योजना व नियमाची काटेकोर पणे पालन करण्याचे आवाहन कोरोना डॉ योगेश चौधरी, डॉ वैशाली हिंगे हयांनी केले आहे. 

       शासनाने (दि.५) मार्च पासुन ६० वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिक व ४५ वर्षा वरील दुर्धर आजाराच्या नाग रिकांना कोरोना विषाणु पासुन बचाव करण्याकरिता प्रतिबंधक लस लावणे असुन शुक्रवार (दि.१९) मार्च ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे १४५ व प्राथमि क आरोग्य केंद्र साटक ला ११० अश्या २५५ नागरिकां ना कोरोना प्रतिबंधक लस लावण्यात ़आली. याकरिता तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत वाघ, कोरोना विभाग तालुका प्रमुख डॉ अन्सारी यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान चे वैद्यकीय अधिकारी डॉ योगेंद्र चौधरी, डॉ. गोंडाणे मॅडम व सर्व कर्मचारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र साटक वैद्यकीय अधिका री डॉ वैशाली हिंगे, डॉ प्रज्ञा आगरे सह सर्व कर्मचारी आदी परिश्रम घेत आहेत. दिवसेदिवस कन्हान परिसर व नागपुर जिल्हयात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असुन कोरोना लस जरी देणे सुरू झाली तरी नागरिकांनी को रोना विषाणु प्रतिबंधात्मक शासनाच्या नियमाचे पालन करित स्वच्छता, मॉस्क लावणे, गर्दी टाळणे, सुरक्षित अंतर ठेवणे , कामानिमित्यच घरा बाहेर निघणे, लक्षणे जाणवल्यास कोरोना तपासणी करून घेणे. आपली व कुंटुबाची काळजी घ्या. आदीचे काटेकोरपणे पालन केल्यास या विषाणुजन्य आजारा वर प्रतिबंध लावता येईल यास्तव नागरिकांनी सहकार्य करावे असे आवा हन कोरोना कन्हान वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी व साटक वैद्यकीय अधिकारी डॉ वैशाली हिंगे हयानी केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कन्हान परिसरात १६ पॉझीटिव्ह रूग्ण आढळले : कोरोना अपडेट

Sun Mar 21 , 2021
कन्हान परिसरात १६ पॉझीटिव्ह रूग्ण आढळले #) कन्हान चाचणीत कन्हान १४, साटक खाजगी तुन २ असे एकुण १६ रूग्ण आढळले.  #) कन्हान ९,टेकाडी २, कांद्री २,बोरडा २, साटक  १,असे १६ आढळुन कन्हान परिसर १४०२ रूग्ण.     कन्हान : – कोविड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान तर्फे नगरपरिषद नविन […]

Archives

Categories

Meta