कन्हान शहरात वेकोलिच्या कोळसा व माती डम्पींग मुळे धुळीचे साम्राज्य वेकोलिच्या विरोधात मोठे जनआंदोलन होण्याची दाट शक्यता महाराष्ट्र प्रदुर्शन नियंत्रक मंडळांच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह 

कन्हान शहरात वेकोलिच्या कोळसा व माती डम्पींग मुळे धुळीचे साम्राज्य

वेकोलिच्या विरोधात मोठे जनआंदोलन होण्याची दाट शक्यता

महाराष्ट्र प्रदुर्शन नियंत्रक मंडळांच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह

कन्हान,ता.२० एप्रिल

    शहरालगत असलेल्या कामठी खुली कोळसा खदानच्या माती डम्पींग मुळे मोठमोठया कुत्रिम टेकडया तयार झाल्या असुन याच कुत्रिम टेकडयावर मोठया व्हॉल्वो ट्रक ने कोळसा व माती डम्पींग मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

 

 

   कन्हान- पिपरी शहरातील दाट लोक वस्तीत दुरवर मातीचे कण उडुन मोठया प्रमाणात धुळीचे वातावरणात चादर निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्यावर, जिवनमानावर दुष्परिणाम होत आहे. नागरिकांना धुळीचा भयंकर त्रास असुन सुध्दा महाराष्ट्र प्रदुर्शन नियंत्रक मंडळ व अधिकारी मुंग गिळुन गप्प का आहे ? अशी संप्तत चर्चा नागरिकांच्या चर्चेतुन सामोर येत आहे.


वेकोलि कामठी उपक्षेत्र अंतर्गत कामठी व इंदर खुली कोळसा खदान ही दाट लोकवस्तीच्या कन्हान- पिपरी शहरालगत असुन कोळसा खदान च्या कोळसा उत्खनना करिता ५०० फुट खोलीच्या वर माती खोदुन कोळस्याचे उत्खनन करण्याचे काम खाजगी कंत्राटदार करित आहे. कंत्राटदार जास्त नफा मिळविण्या करिता खदानची माती दुर लांब न टाकता जवळच कोळसा व माती डम्पींग करून उंचच उंच कुत्रिम टेकडया तयार करित आहे. शहरालगतच्या उंच मोठमोठया टेकडयावर पाणी न मारता मोठया व्हॉल्वो ट्रक ने माती डम्पींग करित असल्याने ही माती हवेने उडुन कन्हान शहरातील अशोक नगर, सुरेश नगर, राय नगर, संताजी नगर, नाकां नं ७, शिवनगर, इंदिरानगर, आंनद नगर, राधाकृष्ण नगर, हनुमान नगर, लोहिया लेआऊट , रामनगर, गणेशनगर, स्टेशन रोड, सत्रापुर, विवेकांनद नगर, पटेल नगर, शिवाजी नगर, धर्मनगर, पिपरी व कांद्री परिसरातील दाट लोकवस्तीत पडुन मोठया प्रमाणात माती व कोळसा धुळीचे प्रदुर्शन होत नागरिकां च्या घरात, महामार्गावर, दुकानात माती धुळीचे थर बसत असल्याने नागरिकांना वारंवार साफ -सफाई नित्याची झाली आहे.

    हवेत मोठया प्रमाणात कोळसा मिश्रीत माती धुळीचे प्रदुर्शन होत असुन श्वासोश्वासा व्दारे नागरिकांच्या शरीरात धुळ जाऊन श्वास घेण्यास त्रास होत आहे. दमा, खोकला, पोटाचे आजार, डोळ्याचे आजार असे विविध शहरात रोग राईचे प्रमाण वाढुन कोळसा मिश्रित माती धुळीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. येथील नागरिकांनी वेळोवेळी वेकोलि प्रशासना ला तक्रारी केल्या असल्याने तात्पुरती माती डम्पींग बंद करण्यात येते. यावर योग्य उपाय योजना न करता काही दिवसाने कोळसा मिश्रित माती डम्पींग जोमाने करित असतात. सध्या उन्हाळा सुरू झाल्याने कोळसा उत्खनना करिता मोठया प्रमाणात माती व कोळसा डम्पींग सुरू असल्याने कन्हान, पिपरी, सत्रापुर, कांद्री परिसरात कोळसा मिश्रित माती धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असुन सुध्दा वेकोलि प्रशासनावर महाराष्ट्र प्रदुर्शन नियंत्रक मंडळाचे अधिकारी योग्य ती कार्यवाई करित नसल्याने हे मंडळ प्रदुर्शनावर नियंत्रण न करता फक्त मलिंदा खाण्या करता अधिका-यांची शासनाने नियुक्ती करण्यात आली आहे का ? असे शहरात कुजबुज सुरु आहे.


वेकोलि कामठी उपक्षेत्र अंतर्गत कामठी व इंदर खुली कोळसा खदान कोळसा उत्खनन करताना मोठया प्रमाणात कोळसा व माती धुळीचे प्रदुर्शन करून परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर, जिवनमानावर दुषपरिणाम होत असुन सुध्दा संबधित वेकोलि व शास नाचे अधिकारी कोळसा व माती धुळीचे प्रदुर्शन त्वरित बंद करून योग्य उपाय योजना केल्या नाही तर येणा-या काळात वेकोलि च्या विरोधात मोठे जनआंदोलन होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

ईद के अवसर पर पुर्व मंत्री सुनील केदार ने मुस्लिम भाईयोको दी शुभकामनाये

Sat Apr 22 , 2023
*ईद के अवसर पर पुर्व मंत्री सुनील केदार ने मुस्लिम भाईयोको दी शुभकामनाये* सावनेरः मुस्लिम भाईयोके पावन रमजान ईद के अवसर पर क्षेत्रके लोकप्रिय जननेता तथा राज्यके, पुर्व पशुसंवर्धन, दुग्धविकास,युवा व खेल मंत्री सुनील केदार ने सावनेर शहरके इदगाह पहुचकर मुस्लिम भाईयोको इद की शुभकामनाये देते हुये कहा हमारा भारत […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta