उपविभागीय पोलीस अधिकारी ने धाड मारून अवैद्य कोळसा चोरीचा ट्रकसह आरोपी पकडले :३ लाख २५ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त  

उपविभागीय पोलीस अधिकारी ने धाड मारून अवैद्य कोळसा चोरीचा ट्रकसह आरोपी पकडले

#) कन्हान पोलीसांची कारवाई ३ लाख २५ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त. 

कन्हान : –  पोलीस स्टेशन अंतर्गत गोंडेगाव परिसरात उपविभागीय पोलीस अधिकारी जिल्हा गस्त करित असतांना गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीसांनी धाड मारून गोंडेगाव खदान चा चोरीचा कोळसा भरू न घेवुन जात असतांना ट्रक पकडुन आरोपी सह ट्रक व पाच टन कोळसा असा तीन लाख पंचवीस हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोन आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून ही कारवाई करण्यात आली.

        प्राप्त माहिती नुसार बुधवार दि.१९ मे २०२१ ला १२:५० ते १:३० वाजता च्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान साहेब हे आपल्या वाहन चालक शिपाई सह जिल्हा ग्रस्त करीत असतांना गोपनीय सुत्राकडुन माहिती मिळाली की, गोंडेगाव येथे एक ट्रक क्र. एम एच ४० – ४७१६ मध्ये वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा खदान चा चोरी केलेला कोळसा भरून घेवुन जात आहे. याची खात्री करून  पोलीसांनी घटनास्थळी सरकारी वाहनाने जावुन धाड मारली असता कोळसा भरणारे मजुर पळुन गेले असुन ट्रक चालकास पकडुन विचारपुस केली असता उमेश पानतावने यांचे सांगण्यावरून ट्रक भरून घेऊन जात आहे. ट्रक चालकाकडे कोणत्याही प्रकारची बिल्टी व गेटपास नसल्याने सदर कोळसा हा चोरीचा असल्याचे निष्पन झाल्याने एक ट्रक क्र. एम एच ४० ४७१६  किंमत तीन लाख रूपये व दगडी कोळसा पाच टन किंमत २५००० रूपये असा एकुण तीन लाख पंचवीस हजार रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन कन्हान पोलीस स्टेशन ला आणुन सरकारी फिर्यादी पोलीस शिपाई विक्की उमेश कोथरे पोलीस स्टेशन खापरखेडा यांचा तक्रारी वरुन आरोपी १) ट्रक चालक बालचंद्र हरिराम बेलोने वय ५६ वर्ष रा. कांन्द्री कन्हान २) उमेश पांनतावने वय ४६ वर्ष रा. कांन्द्री कन्हान यांचा विरुद्ध अप क्र. १४५/२०२१ कलम ३७९,१०९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून ट्रक व कोळसा असा एकुण तीन लाख पंचवीस हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून ही कारवाई करण्यात आली. सदर कार वाई उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कन्हान मा.श्री मुख्तार बागनान यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी, कन्हान पोलीस स्टेशन गुन्हे शाखा निरीक्षक श्री कदम, सफौ विक्की कोथरे, खुशाल रामटेके, मंगेश ढबाले, जयलाल सहारे, विरेंन्द्र सिंग चौधरी, चापोना संदीप गेडाम आदीने शिताफितीने सापळा रचुन कारवाई यशस्विरित्याने पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

विश्व मानव रुहानी केंद्र आजनी यांच्याद्वारे कोरोना काळात उपयुक्त औषधी सावनेर तहसिलदार यांच्या स्वाधिन

Sat May 22 , 2021
विश्व मानव रुहानी केंद्र आजनी यांच्याद्वारे कोरोना काळात उपयुक्त औषधी सावनेर तहसिलदार यांच्या स्वाधिन सावनेर ता : विश्व मानव रूहानी केंद्र (पंजी)नवानगर एक सामाजिक कार्य करणारी आध्यात्मिक संस्था असून ही संस्था प. संत बलजीत  सिंह जी यांच्या विचार व शिकवणीतून मानवाचे नैतिक व आध्यात्मिक जीवन ध्यान अभ्यास, यांवर आधारित जनकल्याण करण्याकरिता विभिन्न […]

You May Like

Archives

Categories

Meta