अवैद्यरित्या जनावरे कत्तलीकरिता वाहतुक करणारे दोन वाहन जप्त  ४३ गौवंश जनावरा सह १४,१९,००० रू.चा मुद्देमाल जप्त, ५ आरोपीवर गुन्हा दाखल

अवैद्यरित्या जनावरे कत्तलीकरिता वाहतुक करणारे दोन वाहन जप्त

४३ गौवंश जनावरा सह १४,१९,००० रू.चा मुद्देमाल जप्त, ५ आरोपीवर गुन्हा दाखल

कन्हान,ता.१९

   पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस विशेष पथक नागपुर ग्रामिणच्या पथकाने कन्हान ते नागपुर कडे कत्तलीकरिता अवैद्यरित्या वाहतुक करताना सिहोरा शिवारात दोन पिकअप वाहनात निर्दयतेने आखुड दोराने पाय बांधुन कोंबुन ४३ जनावरे गाय, बैल नेताना दोन वाहन चालकास पकडले. त्यांचा ताब्यातुन दोन पिकअप वाहन व ४३ गौवंश जनावरे असा १४ लाख १९ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करित ५ आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून ४३ गौवंश गाय, बैल, कारवड व गौरे यांना पोलिसांनी जिवनदान दिले.

      पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने मंगळवार (दि.१९) सप्टेंबर ला पहाटे ३.१६ वाजता जिल्हा विशेष पथक नागपुर ग्रामिणचे पोलिस उपनिरिक्षक अमित पांडेय सह रामटेक पोस्टे चे पो.हवा नारायण भोयर, पोना पुरुषोत्तम काकडे, कन्हान पोस्टे चे पोशि वैभव बोरपले, पोशि निखिल मिश्रा यांचे पथक तपास कामा सह अवैध्य धंद्यावर कार्यवाही करणे कामी रात्रपाळी गस्तीवर असताना खात्रीशीर माहीती मिळाली की, कन्हान हद्दीतील सिहोरा शिवारातुन कामठी येथिल जिया कुरेशी हा त्याचे जानावराच्या ठिय्यावरून अवैधरित्या गौवंश जनावरे कत्तलीकरिता वाहनात निर्दयतेने भरून वाहतुक करणार आहे.

    अशा माहितीवरून सिहोरा शिवारात जनावराच्या ठिय्यावर रेड केली असता ४ ईसम दोन पिकअप वाहणासह दिसुन आले. त्या पैकी अंधाराचा फायदा घेवुन पोलीसांना पाहुन दोन ईसम पळाले तर दोन ईसम घटनास्थळी मिळुन आले. सदर मालवाहु वाहणापैकी एक पिकअप वाह न क्र. एमएच ४९ एटी ८६८१ मध्ये लहान मोठे लाल पांढ-या रंगाचे एकुण आठ जणावरे दोराने निर्दयतेने पाय बांधुन कोंबुन भरलेले मिळुन आले. तर दुसरा पिकअप वाहन क्र.एमएच २५ पी ५८२५ मध्ये जनावरे भरण्याच्या ठिय्यावर खाली दोरा ने चारापाणी न देता निर्दयतेने जनावरे बांधलेली मिळुन आले. मो.तालीब खान वल्द मोहम्मद खान वय २२ वर्ष रा. कामठी माल वाहु वाहन एमएच ४९ एटी ८६८१ चा चालक असुन गोवंश वाहनात भरण्यास मदत करतो. व जुबेर खान वल्द हफिज खान वय २६ वर्ष रा. कामठी माल वाहु वाहन क्र.एमएच २५ पी ५८२५ चा चालक असुन गोवंश वाहनात भरण्यास मदत करतो.

   त्यांच्या ताब्यातील १८ बैल गोंवश प्रत्येकी किमत १२००० रू. प्रमाणे २,१६,००० रूपये, १५ गाय गोवंश प्रत्येकी किमत १०,००० रू. प्रमाणे १,५०,००० रूपये, ७ कालवड प्रत्येकी ५,००० रु. प्रमाणे ३५,००० रू. तसेच ०३ बैल जातीचा बछडे गोरे प्रत्येकी६,००० रू प्रमाणे १८,००० रूपये असे एकुण ४३ गौवंश जनावरां ची एकुण किमत ४,१९,००० रूपयाचे गोवंश जनावरे अवैध्यरित्या क्रुरतेने बांधुन व वाहनात कोंबुन मिळुन आल्याने दोन्ही माल वाहु वाहन किमत १०,००,००० रूपये असा एकुण १४,१९ ,००० रूपयाचा मुद्देमाल अवैधरित्या मिळुन आल्याने दोन्ही वाहन व त्यातील ४३ गोवंश जनावराची जप्ती पंच नाम्या प्रमाणे कार्य वाही करून ताब्यात घेतले. गौवंश जनावरांची चारापा ण्याची व्यवस्था करण्याकरीता गौशाळा कल्याणकारी संस्था देवलापार त. रामटेक, जि.नागपुर गौशाळेच्या स्वाधिन करण्यात आले. कन्हान पोस्टे ला सरकार तर्फे फिर्यादी पो.हवा नारायण भोयर पोस्टे रामटेक यांचे तक्रारीवरून कन्हान पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते यांचे मार्गदर्शनात पोस्टे ला आरोपी मो.तालीब खान वल्द मोहम्मद खान, जुबेर खान वल्द हफिज खान, जिया कुरेशी सर्व रा. कामठी आणि प़ळुन गेलेले दोन अनोळखी इसमा विरूध्द अप क्र ६१०/२३ कलम ११(१), ११(१)(अ),(ड),(इ),(एफ), ११(१)( i ). प्रा. छ. प्र. अधि.१९६० सहकलम ५(अ), ५(ब), म.प्रा.सं.अधि.१९९५, सह कलम ११९ मपोका, सह कलम १०९, ३४ भादंवि. अन्वये गुन्हा नोंद करून कन्हान पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते पुढील तपास करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

२९ सप्टेंबर रोजी जश्ने ईद ए मिल्लादुन्न नबीचा जुलूस

Wed Sep 20 , 2023
२९ सप्टेंबर रोजी जश्ने ईद ए मिल्लादुन्न नबीचा जुलूस कन्हान,ता.१९    पैगंबर इस्लाम मोहम्मद सलल्लाहो अलैही वसल्लम च्या जन्माच्या मुबारक उत्साहाकरिता काढण्यात येणारा जुलूस या वर्षी श्री गणेश मुर्तीचे विसर्जन कार्यक्रम आल्याने कन्हान येथे जूलुस शुक्रवार (दि.२९ ) सप्टेंबर ला काढण्यात येणार आहे.     देशात व राज्यात दरवर्षी प्रमाणे […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta