२९ सप्टेंबर रोजी जश्ने ईद ए मिल्लादुन्न नबीचा जुलूस

२९ सप्टेंबर रोजी जश्ने ईद ए मिल्लादुन्न नबीचा जुलूस

कन्हान,ता.१९

   पैगंबर इस्लाम मोहम्मद सलल्लाहो अलैही वसल्लम च्या जन्माच्या मुबारक उत्साहाकरिता काढण्यात येणारा जुलूस या वर्षी श्री गणेश मुर्तीचे विसर्जन कार्यक्रम आल्याने कन्हान येथे जूलुस शुक्रवार (दि.२९ ) सप्टेंबर ला काढण्यात येणार आहे.

    देशात व राज्यात दरवर्षी प्रमाणे साजरा होणारा गणेशोत्सव कार्यक्रम साजरा होत आहे. गुरूवार (दि. २८) सप्टेंबर २०२३ ला श्री गणेश मुर्तीचे विसर्जनाच्या दिवसीच ईद ए मिल्लादुन्न नबी चा जूलुस ही आल्याने कन्हान येथील सुन्नी मस्जिद ए रजा कमेटी व मुस्लिम समाज बांधवानी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला. आपण भारतीय एक असुन आपसात सहकार्य, प्रेम, विश्वास आणि सदभाव प्रस्तापित करण्याच्या सार्थ हेतुने (दि. २८) सप्टेंबर २०२३ चा जूलुस कन्हान येथे शुक्रवार (दि.२९ ) सप्टेंबर २०२३ ला काढण्याचे ठरविण्यात आले. एकत्र आलेले दोन्ही सण, उत्सव धार्मिक सदभावनेने हर्षो उल्लाहासात साजरे करण्यात येणार आहे. कमेटी च्या पुढाकाराचे मोतीराम रहाटे, सचिन गजभिये, श्याम बाबु पीपलवा, ऋषभ बावनकर, कमल यादव, अरविंद देशमुख, प्रशांत मसार, अशोक मोरपाना, चिराग वैद्य, शिवशंकर हलमारे, ज्ञानेश्वर राजुरकर सह सामाजिक कार्यकर्ता, बुद्धिजीवी वर्ग व मान्यवर नागरिकानी कौतुक करित अभिनंदन करून दोन्ही उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहे. सुन्नी मस्जिद ए रजा चे अब्दुल लतीफ़ शेख, शेख अकरम कुरैशी, मोहम्मद अली आजाद, मोहम्मद शफीक शेख, हाजी शेर मोहम्मद, सईद खान, शाहिद रजा, चांद भाई टेकाडी, फैयाज खान, एथेश्याम सैय्यद, फिरोज मोहम्मद, शेख ज़ाकिर, शारिक शेख, जुबेर खान, रशिद पठान, इसराइल खान, फिरोजखान , गौस मोहम्मद, सिराज अंसारी, चांद शेख, आशिक अंसारी, शकील पटेल, असलम शेख, हमीद बेग आदी ने सर्व समाज बांधवाना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

व्यसनाचा आहारी जाऊ नका, आरोग्य सांभाळा चिमुकल्यांनी दिला संदेश  कन्हान शहरात विविध ठिकाणी ताना पोळा साजरा 

Wed Sep 20 , 2023
व्यसनाचा आहारी जाऊ नका, आरोग्य सांभाळा चिमुकल्यांनी दिला संदेश कन्हान शहरात विविध ठिकाणी ताना पोळा साजरा कन्हान,ता.१९   सकाळ पासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे लहान मुलांचे चेहरे हिरमुसली दिसली. पण मात्र सायंकाळी पाऊस थांबल्याने मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला.यातच आयोजकांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील निर्णय जनरल स्टोअर्स, शिव नगर, तारसा […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta