सयुक्त कुंटुबाचे कर्ते पुरूष श्री कृष्णाजी मसार यांचे दु:खद निधन

सयुक्त कुंटुबाचे कर्ते पुरूष श्री कृष्णाजी मसार यांचे दु:खद निधन

कन्हान : – आधुनिक युगात सुध्दा पिपरी-कन्हान येथील मसार सयुक्त परिवारातील सयुक्त कुंटुब पध्दतीचे पुरस्कर्ते पुरूष श्री कृष्णाजी लक्ष्मणजी मसार यांचे वृध्पकाळाच्या आजाराने दु:खद निधन झाले. ते ८३ वर्षाचे होते.
कन्हान गांधी चौकात सायकल दुरूस्तीचे दुकान व खेडी (गहुहिवरा) येथे शेती करणारे श्री बाजीरावजी व कृष्णाजी मसार हे दोन्ही भाऊ परिवाराचा उदरनिर्वाह करायचे. त्यात मोठे भाऊ बाजीरावजी मसार यांचे २००३ म्हणजे १८ वर्षा पुर्वी निधन झाले. तरी श्री कृष्णाजी मसार हे त्यांचे तीन मुले व दोन मुली आणि मोठे भाऊ बाजीरावजी यांचे तीन मुले, दोन मुली यात चार बहीणी आणि पाच भावाचे विवाहीत असुन फक्त लहान मुलगा प्रंशात मसार चा विवाह होणे बाकी आहे . आजही कन्हान परिसरातील पिपरी शहरात वहिणी, पत्नी, मुले, सुना व नातु, नातीण सह एकुण २५ सदस्य एकाच घरी सयुक्त कुंटुब पध्दतीने राहत असतात. या आदर्श सयुक्त कुंटुबाचे चालक श्री कृष्णाजी मसार यांचे सोमवार (दि.२०) डिसेंबर ला सकाळी ९ वाजता राहत्या घरी वृध्पकाळाने दु:खद निधन झाले. त्याची अंतिम यात्रा राहते घर पिपरी येथुन सायंकाळी ४ वाजता काढुन कन्हान नदीच्या पिपरी शांती घाटावर सामुहीक श्रध्दाजंली अर्पण करून अंतिम संस्कार करण्यात आला.

 मुतक श्री कृष्णाजी मसार 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना प्रकरणानंतर कन्हान राष्ट्रवादी आक्रमक

Tue Dec 21 , 2021
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना प्रकरणानंतर कन्हान राष्ट्रवादी आक्रमक कन्हान : – कर्नाटक राज्यातील बंगळुर येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकच्या पुतळ्याची विटंबना करणा-या समाज कंटकावर कार्यवाही न करता कर्नाटक चे मुख्यमंत्र्यानी छोटी गोष्ट असल्याचे वक्तव्य करणे या प्रकारामुळे राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक होत. या घटनेचा जाहीर निषेध केला. कर्नाटकातील बंगळुरूमध्ये छत्रपती […]

You May Like

Archives

Categories

Meta