*कन्हान व कांद्री येथे वट पौर्णिमा उत्सव थाटात साजरी*
कन्हान – कन्हान व कांद्री परिसरात वट पौर्णिमा निमित्य विवाहित स्त्रियांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करुन वटवृक्षाची विधिवत पुर्जा अर्चना करुन मंगळवार (ता१४) जून 2022 रोजी पहाटे पासुन तर सायंकाळपर्यंत वट पौर्णिमा साजरी करण्यात आली .
हिंदू पंचांगानुसार , ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला वट पौर्णिमा व्रत केले जात असुन हिंदू धर्मात या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
वटसावित्री दिवशी सुवासिनी महिला वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सौभाग्यलंकार परिधान करून वडाचे पूजन केले जाते. सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवून या दिवसाला महत्व आणून दिले, तसेच आजन्म सहवास आणि सातजन्माची साथ लाभण्यासाठी स्त्रिया देखील या व्रताचे परंपरेनुसार पूजन करतात.
मागील दोन वर्षापासुन कोरोना महामारीच्या निर्बंधामुळे स्त्रियांना वट पूजा करण्यास मुकावे लागले असुन मात्र यंदा कोरोना चा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याने स्त्रियांमध्ये वट पौर्णिमा दिवशी उत्साह चे वातावरण पाहायला मिळाले असुन परिसरातील विवाहित स्त्रियांनी वटपौर्णिमेंच व्रत व सोळा शृंगार करुन वटवृक्षाची विधिवत पूजा अर्चना , आरती करुन झाडाभोवती कच्चा धागा गुंडाळुन तीन परिक्रमा केली . या व्रत दरम्यान विवाहित स्त्रियांनी आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे , दीर्घायुष्य प्राप्त व्हावे अशी कामना करुन
क्रांन्दी-कन्हान शहरातील प्रत्येक वडाचा झाडा जवळ सुहासीनी महिलांची गर्दी आढळुन येत होती. वट सावित्री व्रत असल्याने , सुहासिनी एक मेकींना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देत होत्या. यावेळेस सौ.मालती वांढरे,सौ.ललिता वांढरे सौ.अक्षरा वांढरे,सौ.माधुरी वांढरे,सौ.प्रभा वांढरे,रितीक्षा वांढरे,सौ.श्वेता गिरडे,सौ.हिमानी बरडे,सौ.शशिकला तडस,सौ.शालू बारई,सौ.वंदना महाजन, सौ.अरूणाताई बावणकुळे, सौ.त्रीवेणी सरोदे, सौ.अनुश्री सरोदे, सौ.मुक्ता चांदेकर, सौ.पुजा कुंभलकर, सौ.जया कुंभलकर, सौ.पुष्पाताई कुंभलकर , सौ.तितरमारे आदी महिला वर्ग मोठ्याप्रमाणात उपस्थित होत्या.
.