रेल्वे स्टेशन मालधका यार्ड येथे दोन गटात मारहाण

रेल्वे स्टेशन मालधका यार्ड येथे दोन गटात मारहाण

कन्हान : –  रेल्वे स्टेशन मालधका यार्ड येथे दोन गटात मारहाण होऊन पाच आरोपींनी फिर्यादी व तीन मित्राला मारहाण करून जख्मी केल्या प्रकरणी कन्हान पोलीसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आहे. 

      कन्हान पोलीस स्टेशन पासुन पुर्वेस १ कि मी वर रेल्वे स्टेशन कन्हान मालधका यार्ड येथे सोमवार (दि १९)ला सायं काळी ६ वाजता दरम्यान फिर्यादी दिपक अरविंद त्रिपाठी वय ५३ वर्ष रा विवेकानंद नगर कन्हान यास आरोपी १) हरविंद सिंग पडा २) ट्रक चालक रामु, ३) बिंदर सिंग पडा ४) करमजित सिंग पडा ५) अज्ञात व्यक्ती सर्व रा बाबा बुधाजी नगर कन्हान हयांनी संगनमत करून गैरकायदयाची मंडळी गोळा करून शिवीगाळ करित तेरे वजह से हमारे ट्रक नही भर रहे है  म्हणत फिर्यादी सोबत तीन मित्रा ना हाथबुक्याने, बेसबॉल डंडा, हॉकी, स्टीक, लोखंडी राड, बाबुच्या काठीने मारहाण करून जख्मी केल्याने फिर्यादी च्या तक्रारीवरून कन्हान पोलीस स्टेशन चे पोउपनि सुरजुसे हयांनी कलम ३२४, ३२३, ५०४, १४३, १४७, १४८, १४९ भादंवी नुसार गुन्हा नोंद करून आरोपींचा शोध घेत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान ला नविन दोन रूग्णाची भर  : कोरोना अपडेट

Wed Oct 21 , 2020
कन्हान ला नविन दोन रूग्णाची भर  #) कन्हान चे दोन रूग्ण आढळुन कन्हान परिसर ८३८ रूग्ण.    कन्हान : –  कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ४४ संशयिताच्या रॅपेट व स्वॅब (आरटीपीसीआर ) चाचणी घेण्यात आली. (दि.१९) च्या चाचणीचा एक रूग्णाचा व कामठी खाजगीतुन […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta