डॉक्टर भगत क्लिनिक मध्ये मोठी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार

सावनेर : सावनेर मधील सुप्रसिद्ध हॉस्पिटल भगत क्लिनिक मध्ये महिला रुग्णाच्या पोटामध्ये 10.50 किलो वजनाचा अंडबिजातुन कॅन्सरची सर्वात मोठा गोळा काढण्यात सावनेर येथील भगत क्लिनिकच्या डॉक्टरांना यश आले आहे. 20 डिसेंबर रोजी, 10.50 किलो वजनाच्या अंडबिजात कर्करोगाचा सर्वात मोठा गोळा यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आला.
सदर महिलेला एका वर्षापासून पोटाचे दुखणे होते, उपचाराकरिता हॉस्पिटल मध्ये आल्यानंतर चाचण्याकरून शस्त्रक्रिया करण्याचे ठरले . सर्वात जुने व प्रसिद्ध हॉस्पिटल मध्ये सर्वात मोठा गोळा (10.50) वजनाचा काढलेला पहिली शस्त्रक्रिया आहे .


क्लिनिकमधील सर्जन डॉ. मधुकर ठाकरे, सहायक शल्यचिकित्सक डॉ.प्रशांत भगत, डॉ. अनिकेत ठाकरे, भूलतज्ञ  डॉ. सचिन घटे, परिचारिका सौ.रीता वाघमारे, वंश नानवटकर व क्लिनिकच्या इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. यापूर्वी अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना नागपूरला जावे लागत होते, मात्र आता सावनेर येथील भगत क्लिनिकमध्ये आधुनिक शस्त्रक्रिया गृह (ओ.टी. ) यामुळे, जटिल आणि उच्च जोखमीच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. यात युरो सर्जरी, ऑर्थो सर्जरी, जनरल सर्जरी, जॉइंट सर्जरी यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

रणजी खेळाडूंची प्रशिक्षण शिबिराला सदिच्छा भेट

Sun May 25 , 2025
प्रशिक्षण शिबिराला सदिच्छा भेट* *वरिष्ठ रणजी निवड समिती सदस्य यांनी खेळाडू प्रशिक्षणार्थींना प्रोत्साहन दिले* सावनेर: ड्रीम क्लब सावननेर यांच्या तत्वज्ञानाखाली सुरू असलेल्या उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिरात क्रिकेटच्या नुक्त्या शिकणाऱ्या प्रशिक्षणार्थींचे मनोबल वाढवण्यासाठी, विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे निवडक आणि रणजी ट्रॉफी निवडक आणि छत्तीसगड रणजी संघाचे माजी रणजी कर्णधार विवेक नायडू, माजी […]

You May Like

Archives

Categories

Meta