नमो नमो मोर्चा भारत च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विजयजी हटवार

नमो नमो मोर्चा भारत च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विजयजी हटवार

जाहिरातीसाठी 7020602961

कन्हान : –  नमो नमो मोर्चा भारत ही राष्ट्र प्रथम विचारधाराने प्रेरित देशातील सर्वात मोठी राष्ट्रीय सामाजिक संघटना असुन जी की, प्रधानमंत्री जनकल्याण योजना प्रचार प्रसार करणे, समाजोपयोगी कामे, मदत कार्य व राष्ट्रहिताचे कार्य अखंड करीत आहे. १५ लाख सदस्य संख्या असलेल्या ह्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून श्री विजयजी हटवार यांची नुकतीच नियुक्तीची घोषणा संघटनेचे राष्ट्रीय मुख्य संरक्षक आदरणीय सोमाभाई मोदी यांच्या आशिर्वदाने व मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी,  केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी आदी नमो नमो मोर्चा भारता च्या राष्ट्रीय कोर कमिटी मार्फत करण्यात आली.

       श्री विजयजी हटवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते विदर्भ महामंत्री भाजपा प्रशिक्षण आघाडी, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भाजपा ओबीसी मोर्चा व सदस्य भारतीय खाद्य निगम भारत सरकार नवी दिल्ली सामाजिक व राजकीय प्रवास केलेले एक उतुंग व्यक्तिमत्त्व, प्रदीर्घ अनुभव, अनेक सामाजिक व स्वयंसेवी संघटनेची नाळ असलेले,  शिक्षण क्षेत्रात पण कार्य करणारे, एक राष्ट्रीय नेते तळागाळातील कार्यकर्त्या पासुन ते मोठ्या मोठ्या उद्योग, व्यवसायिक, विविध पक्षातील राजकीय व्यक्तींशी मैत्रीचे नाते जपणारे एक बहुआयामी, हसतमुख आणि हुशार अनुभवी व्यक्तिम त्त्व नमो नमो मोर्चा भारताच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी विराजमान झाल्याने नागपुर, महाराष्ट्रा सह संपूर्ण भारतातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संघटन कौशल्य, अनुभव, जनसंपर्क व वरिष्ठ पातळी वर जपलेले हितसंबंध या जोरावर निश्चितच ते नमो नमो मोर्च्याच्या लाखो सदस्य व पदाधिकारी यांना न्याय देतील अशी आशा आहे. त्याच्या निवडीचे भाजपा राष्ट्रीय कोषाध्यक्ष खासदार सुधीरजी गुप्ता, खासदार रामदासजी तडस, खासदार विकास महात्मे सह श्री सत्यप्रकाश सिंह राष्ट्रीय संयोजक, श्री सोपान उंडे पाटील राष्ट्रीय मुख्य समनव्यक आदीनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

साटक येथे २४ डिसेंबर ला महा रक्तदान शिबीराचे आयोजन

Mon Dec 21 , 2020
साटक येथे २४ डिसेंबर ला महा रक्तदान शिबीर कन्हान : – ग्राम पंचायत साटक, प्राथमिक आरोग्य केंद्र, अपोलो क्लासेस व कॅरियर अकॅडेमी साटक- नगरधन व आकाशझेप फाऊंडेशन रामटेक यांच्या सयुक्त विद्यमाने साटक येथे २४ डिसेंबर ला महा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.    ” देऊ मनुष्याला जिवाचे दान, चला […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta