कल्याणी सरोदे यांना भारत गौरव पुरस्कार सन्मानित

कल्याणी सरोदे यांना भारत गौरव पुरस्कार सन्मानित

कन्हान ता.२१ डिसेंबर

     जागतिक मानवाधिकार भारत गौरव फाऊंडेशन आणि ग्लोबल अजय मेस्राम वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने नागपूर येथील सुरेश भट्ट सभागृहात सोमवार (दि.१२) डिसेंबर “भारत गौरव पुरस्कार शो” घेण्यात आला.

     जन्मभूमी टाइमचे संपादक सुरेंद्र गजभिये, ब्रजेश डहरवाल, मोहशीन जफर साहेब, ताजुद्दीन बाबा यांच्या हस्ते हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जागतिक मानवाधिकार भारत गौरव सन्मान फाऊंडेशनचे संचालक राजिक खान यांनी सर्व धर्मांना एकत्र आणून भारताचा अभिमान वाढविण्याविषयी सांगितले, कार्यक्रमाचे अध्यक्ष राजा मुधोजी भोसले वेदप्रकाश ओझा उपस्थित होते.

     या अवॉर्ड शोमध्ये, नागपूर जिल्हायातील कांद्री- कन्हान गावात राहणाऱ्या बॉलीवूड सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट कु.कल्याणी सरोदे यांना भारत गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कल्याणी सरोदे‌‌ यांना नुकताच चित्रपट मालिकेतील तिच्या कामासाठी सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्टचा पुरस्कार मिळाला होता. एका छोट्या गावातील रहिवासी असून उद्योगांत आपली छाप सोडली.‌‌या

    सोबतच सोनू सूद, जस्मिन भसीन, प्रार्थना बेहेरे, राहुल वैद्य, राखी सावंत, आजमा फाला, रोशनी कपूर, रुपाली गांगुली, गोल्डन बॉईज यांच्याकडून‌ सुध्दा पुरस्कार मिळाले आहे. सनी, कार्तिकी गायकवाड अदा‌ खान, हिना खान, कुलकम उस, आसनूर कोरली, गोनी शिवांगी, जोशी सोनवणे यांच्या हस्ते देखील कलाकार सन्मान मिळाला आहे. यात आपली प्रतिभा दाखवली आहे.

   प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजा मुधोजी भोसले, वेदप्रकाश ओजा भारताचे आयुर्वेदिक स्वदेशी अध्यक्ष जगातील सर्वात लहान महिला ज्योती अंबे, गगन मलिक अभिनेता आणि बुद्ध धम्म प्रचारक गगन मलिक, नरेंद्र मोदी विचार मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष रवी चाणक्य, विकास महाजन अभिनेता, विकास महाजन गायक मशीन खान आदी मान्यवर मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

आ.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते सेतू कार्यालयाचे उद्घाटन कार्यालय उद्घाटन प्रसंगी विविध शिबिरांचे आयोजन

Wed Dec 21 , 2022
आ.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते सेतू कार्यालयाचे उद्घाटन कार्यालय उद्घाटन प्रसंगी विविध शिबिरांचे आयोजन कन्हान,ता.२१ डिसेंबर        समाजसेवक  चिंटू वाकुडकर यांचा ( सेतू) जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार ॲड.आशिष जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार (दि.१९) डिसेंबर रोजी‌ गणेश नगर, पांधन रोड, कन्हान येथे विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.     […]

You May Like

Archives

Categories

Meta