आ.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते सेतू कार्यालयाचे उद्घाटन
कार्यालय उद्घाटन प्रसंगी विविध शिबिरांचे आयोजन
कन्हान,ता.२१ डिसेंबर
समाजसेवक चिंटू वाकुडकर यांचा ( सेतू) जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार ॲड.आशिष जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार (दि.१९) डिसेंबर रोजी गणेश नगर, पांधन रोड, कन्हान येथे विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. 
शिबीरा मध्ये आमदार ॲड.आशिष जयस्वाल यांचे विशेष अभियान “आपले आमदार कार्यालय आपल्या दारी” राबवण्यात आले. शिबिरामध्ये नवीन उपभोगतांचे वोटिंग कार्ड -७०,आधार कार्ड- १०, राशन कार्ड- ४२, निराधार कार्ड- १८, इ श्रम कार्ड – ३४ करण्यात आले. मुख्यत्वे ऑटो चालक व आशा सेविका यांचा भारतीय डाक विभागाचा अपघाती १० लाखाचा विमा ६३ लोकांचा काढण्यात आला. शिबिर पूर्णपणे निःशुल्क करण्यात आले होते.
प्रसंगी रामटेक विधानसभेचे आमदार ॲड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते सेतू कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला न.प. नगराध्यक्षा सौ.करुणाताई आष्टणकर, वर्धराजजी पिल्ले, अनिल भाऊ ठाकरे, यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता समशेर पुरवले, आशीष वानखेडे, मिथूल पौनिकर, छोटू राणे, सोनू खान, अजय चव्हाण, प्रदीप गायकवाड, श्रीकृष्ण माकडे आदी लोकांच्या सहभाग राहिला.
Post Views: 213