इंडियन मेडिकल असोसिएशन सावनेर शाखा तर्फे प्लाजमा दान शिबिर

सावनेर : दिनांक २१ मार्च रविवार रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन सावनेर शाखा तर्फे तीव्र कोविंड असलेल्या रुग्णांकरिता प्लाजमा दान शिबिराचे आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमाप्रसंगी इंडियन अकॅडमी ऑफ इडिया पिडियाट्रिक्स नागपूर शाखेचे नुकतेच नवनियुक्त अध्यक्ष श्री डाॅ. विजयजी धोटे यांनी या शिबिराचे चे उद्घाटन केले. गंभीर कोविंड रुग्णांना या प्लाजमा दाना चा नक्कीच फायदा होईल असे मत  इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेरचे अध्यक्ष डॉ निलेश कुंभारे यांनी व्यक्त केले.

शिबिराचे उद्घाटन करताना डॉ विजय धोटे व इतर मान्यवर

 

 कार्यक्रमाप्रसंगी पदाधिकारी उपाध्यक्ष डॉ आशिष चांडक, कोषाध्यक्ष डॉ शिवम पुण्यानी, सचिव डॉ परेश झोपे, सहसचिव डॉ विलास मानकर उपस्थित होते. आय एम ए सावनेर शाखेचे सदस्य डॉ विजय धोटे डॉ शिवम पुण्यानी, डॉ अमित बाहेती डॉ नितीन पोटोडे, डॉ संदीप गुजर, इतर उपस्थित होते.

याप्रसंगी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन’चे सदस्य डॉ छत्रपती मानापुरे व होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉ राहूल दाते उपस्थित होते.
कोविंड प्लाजमा दान शिबीर इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेर येथे नागपुर येथिल एका खाजगी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले.  प्लाजमा घेण्याचे काम ट्रान्सफ्युजन ऑफिसर डॉ अभिजीत मानकर व श्री किशोर खोब्रागडे यांनी पाहिले.

डॉ परेश झोपे प्लाझ्मा दान करतात

 

शिबिरामध्ये डॉ परेश झोपे डॉ निलेश कुंभारे व डॉ अमित बाहेती यांनी प्लाजमा दान केले.
याप्रसंगी प्रत्येक प्लाजमा दात्याला प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार व अभिवादन करण्यात आले.
या शिबिरात 10 च्या वर  प्लाजमा दात्यांनी प्लाजमा दान केले.

कार्यक्रमाचे मुख्य सूत्रधार डॉ प्रवीण चव्हाण होते  तर
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ परेश झोपे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सिंगारदिप रेती घाट बंद करण्यासाठी गावक-यांचे आंदोलन  

Mon Mar 22 , 2021
सिंगारदिप रेती घाट बंद करण्यासाठी गावक-यांचे आंदोलन #) रेतीच्या वाहतुकीने गावाचा एकमेव रस्ता,  पिण्याची पाईप, शाळकरी विद्यार्थाना धोका.  कन्हान : – सिंगारदिप गाव हे कन्हान नदीला आलेल्या महापुराने आदीच भयंकर नुकसान झाले असताना जिल्हाधिकारी हयानी सिंगारदिप रेती घाट लिलाव करून सुरू केल्याने रेतीची वाहतुक ट्रक्टर,  ट्रकने घाटधारक करित असल्याने गावाचा एकमेव डाबरी […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta