विश्व मानव रुहानी केंद्र आजनी यांच्याद्वारे कोरोना काळात उपयुक्त औषधी सावनेर तहसिलदार यांच्या स्वाधिन
सावनेर ता : विश्व मानव रूहानी केंद्र (पंजी)नवानगर एक सामाजिक कार्य करणारी आध्यात्मिक संस्था असून ही संस्था प. संत बलजीत सिंह जी यांच्या विचार व शिकवणीतून मानवाचे नैतिक व आध्यात्मिक जीवन ध्यान अभ्यास, यांवर आधारित जनकल्याण करण्याकरिता विभिन्न प्रकार चे समाजसेवा कार्याचे आयोजन करतात . कोविड-१९ च्या महामारीत देशाच्या इतर राज्यात पूर्ण उर्जेने आणि पूर्ण सेवा-भावेने सामाजिक कार्य सुद्धा केले गेले.

त्याच उद्देशाने आज दि. २०/५/२०२१ ला विश्व मानव रूहानी केंद्र नवानगर शाखा आजनी त. सावनेर, जि. नागपूर तहसील कार्यालय सावनेर येथे (Covid- 19 care center, saoner) येथे Oxygen masks, Pulse Oximeter, Sanitizer 500ml , N95 masks, Triple layar masks, Death body bag , Tablets – vit D3, tab-dexamethsone, tab- PCM 500,tab- Ivermaxtin 16mg tab- Faviparavir 200mg , tab- Vit C 500 mg, tab – Zinc 50mg , tab – multi-Vit B complex, tab- ondensetron, tab – pantop 40mg , tab – citrizine 10mg , tab – azithromycin 500mg
चे निशुल्क औषधी दिली गेली करिता गरीब आणि गरजू लोकांना वेळेवर औषधोपचार दिल्या जाईल.
विश्व मानव रूहानी केंद्रा च्या सामाजिक कार्यकर्त्यांनी (सेवादार) मोठ्या प्रेम व उत्साहाने ही सेवा दिली.
विश्व मानव रूहानी केंद्र च्या सदस्यांनी सांगितले की अशा प्रकारच्या समाजसेवा कार्याचे आयोजन या संस्थेद्वारा गेल्या अनेक वर्षांपासून हे सामाजिक कार्य चालू आहे. आणि भविष्यात सुद्धा विश्व मानव रूहानी केंद्र अशी समाजसेवा व जनकल्याण कार्यात प्रशासनाला नेहमी सहयोगी देईल.
Post Views: 813