जय तुर्रा प्रकाश मंडळ,नांदगाव तर्फे गुरूपूजा संपन्न  शासनाने शाहीर कलाकारांच्या मागण्या पूर्ण करावे – शा.बावनकुळे

जय तुर्रा प्रकाश मंडळ,नांदगाव तर्फे गुरूपूजा संपन्न

शासनाने शाहीर कलाकारांच्या मागण्या पूर्ण करावे – शा.बावनकुळे

कन्हान,ता.२१ जुलै

      नांदगाव ( येसंबा) येथे नुकतेच जय तुर्रा प्रकाश मंडळ तर्फे गूरुपुजा उत्साहात संपन्न झाली. यावेळी प्रमुख अतिथी शाहीर राजेंद्र बावनकुळे, राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय कलाकार शाहीर मंडळ, मानधन समिती सदस्य यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने यांनी शाहीर कलाकार यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करावे.

सध्या कलाकार यांना २२५० रुपये मानधन मिळत आहे ते मानधन तुटपुंजे आहे. यासाठी शासनाने शाहीर कलाकार यांच्या विविध ज्या मागण्या आहेत ते पूर्ण करावे हीच कलाकार यांची मागणी आहे. यावेळी सरपंच गेंदलाल देशभ्रतार यांनी शाहीर बावनकुळे यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केले. उपसरपंच शिंधुबाई उके, शाहीर भगवान लांजेवार, चीरकुट पुंडेकर, गजानन वडे, विक्रम वांढरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजक शाहीर मधुकर शिंदे मेश्राम, बंडू सरवरे, नामदेव गावंडे, दीपक दिवटे, दिलीप, दुर्गेश, प्रभाकर, शुभम, दीपक, रवी यांनी सहयोग केले. कार्यक्रम सफल करण्यासाठी शाहीर देवराव बाधुके, छंनू टेकाडे, युवराज बाधूके, संदीप तेलंग, विलास रच्छिरे, पुसाराम बांगडे, गुणवंत डेंगे, आकाश बावनकुळे, गिरिधर बावणे, शालिकं शेंडे, किसन वडे, मारोती वानखेडे, संजय ठाकरे, नागेश उके, राजेश ठाकरे, सुधाकर शिंदे, तुळशीराम टोहणे, जितू शिंदे, सचिन खंडाते यांनी परिश्रम घेतले.
शेंडे, किसन वडे, मारोती वानखेडे, संजय ठाकरे, नागेश उके, राजेश ठाकरे, सुधाकर शिंदे, तुळशीराम टोहणे, जितू शिंदे, सचिन खंडाते यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

मतीमंद महिलेशी अतिप्रसंग, अश्लील कृत्य करणारा आरोपी अटक जागरूक नागरिकांनी आरोपीला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन  

Sat Jul 22 , 2023
मतीमंद महिलेशी अतिप्रसंग, अश्लील कृत्य करणारा आरोपी अटक जागरूक नागरिकांनी आरोपीला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन कन्हान,ता.२१ जुलै     मोहल्यात घरी, एकटा राहणा-या नराधमाने गावात बेवारस फिरणा-या वेळसर महिलेला घरी आणुन तिच्या सोबत जबरदस्तीने अतिप्रसंग करून आपली भुक भागविण्याकरिता अश्लील कृत्य करणारा आरोपी अनिल हांडा यास मोहल्यातील जागरूक नागरिकांनी पोलिसांना […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta