शाहीर प्रदिप कडबे यांच्या जाहीर सत्कार 

शाहीर प्रदिप कडबे यांच्या जाहीर सत्कार

कन्हान,ता.२२ जुलै

    लोकशाहीर वस्ताद स्व.भीमराव बावनकुळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गुरुवंदन सोहळा भव्य विदर्भस्तरीय शाहीर कलाकार मेळावा नुकताच कामठी येथील श्रीराम जानकी मंगल कार्यालयात पार पडला. भारतीय कलाकार शाहीर मंडळ व सर्वस्तरीय कलाकारांच्या करीता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये रामटेक तालुक्यातील किरणापूर येथील भीमशाहीर प्रदीप बागवान कडबे यांना स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ तथा प्रमाणपत्र देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

    कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार देवराव रडके, काँग्रेसचे नरेश बर्वे, रामटेक विधानसभा क्षेत्राचे चंद्रपाल चौकसे, कवी ज्ञानेश्वर वाकुडकर, गणेश देशमुख, शाहीर राजेंद्र बावनकुळे, ब्रह्मा नवघरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. दरम्यान भारतीय कलाकार शाहीर मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र बावनकुळे व सर्वस्तरीय कलाकार संस्था तुमसर जिल्हा भंडाराचे अध्यक्ष गणेश देशमुख यांच्या हस्ते शाहीर प्रदीप बागवान कड़वे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन नरेश देशमुख यांनी केले तर आभार सूरज नवघरे यांनी मानले. विदर्भातून अनेक शाहीर कलावंतांनी या मेळाव्याला हजेरी लावली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

मणिपूर येथे घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध, मुक मोर्चा  काँग्रेस कमेटी महिला आघाडीच्या नेतृत्वात मुक मोर्चा 

Sun Jul 23 , 2023
मणिपूर येथे घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध, मुक मोर्चा काँग्रेस कमेटी महिला आघाडीच्या नेतृत्वात मुक मोर्चा कन्हान,ता.२२ जूलै     कन्हान शहर काँग्रेस कमेटी महिला आघाडीच्या पदाधिकर्यांनी मणिपुर येथे घडलेल्या घटनेचा विरोध दर्शविला. राजेंद्र मुळक सहाय्यता कक्ष सेंट्रल बँक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत हातावर काळी पट्टी बांधुन मुक मोर्चा काढला. […]

You May Like

Archives

Categories

Meta