नवेगांव खैरी पेच धरणाचे दोन वक्रद्वार ०.१५ मी. उघडले पेंच, कन्हान नदीत पाण्याचा विसर्ग, नागरिकांनी सावधगिरी बाळगावी – सावरकर

नवेगांव खैरी पेच धरणाचे दोन वक्रद्वार ०.१५ मी.उघडले

पेंच, कन्हान नदीत पाण्याचा विसर्ग, नागरिकांनी सावधगिरी बाळगावी – सावरकर

कन्हान,ता.२२ ऑगस्ट

   पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी पेंच धरणातील जलसाठ्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज मंगळवार ला सकाळी ६ वाजता पर्यंत धरणात १०० टक्के जलसाठा झाल्याने दुपारी धरणाचे दोन वक्र द्वार उघडुन पेंच व कन्हान नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदी काठावरील व संबधित नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा केला आहे.

     मागील काही दिवसा पासुन पावसाने विश्रांती घेतली होती. शनिवार पासुन छिंदवाड़ा, मध्य प्रदेशात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. सतत होत असलेल्या पावसामुळे चौराई धरणाचे दोन गेट उघडल्याने तोतलाडोह धरणातील जलसाठ्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

    तोतलाडोह धरणातील अजल बोगद्यातुन सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग यामुळे पेंच नवेगांव खैरी धरणाच्या जलसाठ्यात आज मंगळवार (दि.२२) ऑगस्ट ला सकाळी ६ वाजता १०० टक्के जलसाठा झाला. दुपारी १२ वाजता धरणाचे दोन वक्र द्वार ०.१५ मीटर ने उघडण्यात आले. त्यातुन ३१.६८४ क्युमेक्स पानी पेंच व कन्हान नदी पात्रात सोडण्यात येत आहे. सोडणारा विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकतो. त्यामुळे पेंच व कन्हान नदी पात्राच्या जलसाठ्यात वाढ होण्याची शक्यता वाढली असुन नागरिकांनी नदी पात्रा जवळ जाणे टाळावे.

     नदी काठाच्या गावांना तसेच नदी पात्रातुन आवागमन करणाऱ्या सर्व संबंधितांनी स्वत: ची काळ जी घ्यावी असा सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदी पात्र ओलांडु नये, शेतीची अवजारे नदी पात्रात ठेऊ नये, जनावरांना नदी पात्र ओलांडु देऊ नये असे कळकडीचे आवाहन पेंच पाटबंधारे उप विभाग पारशिवनी, उपविभागीय अभियंता एन एस सावरकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

धर्मराज प्राथमिक शाळेतर्फे विद्यार्थी निर्मित चांद्रयान प्रतिकृती

Wed Aug 23 , 2023
धर्मराज प्राथमिक शाळेतर्फे विद्यार्थी निर्मित चांद्रयान प्रतिकृती कन्हान,ता.२३ ऑगस्ट       चांद्रयान ३ च्या यशस्वीतेसाठी धर्मराज प्राथमिक शाळा कांद्री- कन्हानच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी चांद्रयानची प्रतिकृती तयार करुन भारत माता की जय, वंदे मातरम, चांद्रयान विजयी भव ! अशा घोषणा देत चांद्रयान ३ या मोहिमेला शुभेच्छा दिल्या. चांद्रयान ३ या मोहिमे […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta