महामार्गावर कोळसा ट्रकची दुचाकीला धडक, भिषण अपघात मुलीचा मृत्यु
#) कन्हान पोलीस स्टेशन ला कोळसा बारा चाकी ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल.
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत एम एच के एस पेट्रोल पंप जवळ कोळसाच्या बारा चाकी ट्रकने दुचा की वाहनाला मागुन जोरदार धडक मारल्याने झाले ल्या अपघातात दुचाकीवर मागे सवार मुलीचा मृत्यु झाल्याने कन्हान पोलीस स्टेशनला आरोपी बारा चाकी ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे .
पोलीस सुत्रानुसार प्राप्त माहिती नुसार रविवार (दि.२१) नोव्हेंबर ला सकाळी ११:३० ते ११:४५ वाज ता दरम्यान गणपत मोतीराम वंजारी वय ३० वर्ष राह. शिवनगर कन्हान हा आपल्या दुचाकी वाहन क्र. एम एच ४० ए एच १८५२ हिरो डिलक्स ने मृतक भासी कु करीना राजाराम भुते वय १८ वर्ष राह. साटक हिला कन्हान येथुन तिच्या घरी साटक ला नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गाने नेऊन देत असतांना एम एचकेएस पेट्रोल पंप वराडा जवळ कोळसाच्या बारा चाकी ट्रक क्र. एम एच ४० सी डी ३४६१ च्या चालका ने आपले वाहन निष्काळजीपणाने व वेगाने चालवुन दुचाकी वाहनाला मागुन धडक मारल्याने झालेल्या अपघातात मागे सवार भासी कु करिना भुते खाली पडु न डोक्याला मार लागल्याने तिला उपचाराकरिता काम ठी रुग्णालय येथे नेले असता डाॅक्टरांनी मृत घोषित केले. तसेच गणपत वंजारी ला अपघातात किरकोळ मार लागल्याने त्यास उपचाराकरिता कामठी रुग्णाल यात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व कन्हान पोलीस स्टेशनचे एपीआई सतिश मेश्राम सह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोह चुन पंचनामा करून कोळसाच्या बारा चाकी ट्रक व दुचाकी वाहन ताब्यात घेतले. सदर प्रकरणी कन्हान पोलीसांनी फिर्यादी गणपत मोतीराम वंजारी यांच्या तक्रारीवरून ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला असुन कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे च्या मार्गदर्शनात एपीआई सतिश मेश्राम सह पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहे.
मृतक कु. करिना भुते