धर्मराज विद्यालयात गरजवंताना ब्लॅकेटचे वाटप

धर्मराज विद्यालयात गरजवंताना ब्लॅकेटचे वाटप

कन्हान – येथील धर्मराज विद्यालयात रामकृष्ण मठ, नागपूरद्वारा गरजवंत ५० पालकांना सोमवारी (ता २१) ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले.
धर्मराज विद्यालयात आयोजित कार्यक्रमाला रामकृष्ण मठ नागपूर येथील अनुयायी स्वामी तन्निष्ठानंद, अजय भोयर, अरुण राऊत, चेतन वलूकर उपस्थित होते. सामाजिक दायित्व जपून हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे रामकृष्ण मठ तर्फे जाहीर करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन नरेंद्र कडवे यांनी तर आभार दिनेश ढगे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश राऊत, तेजराम गवळी, मुकेश साठवणे, दामोदर हाडके, प्रणाली खंते, सौ. बावनकुळे, सुनील लाडेकर, अमीत मेंघरे, भिमराव शिंदेमेश्राम, सुनीता मनगटे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

आजनी , कोदेगाव शिवारात पट्टेदार वाघाचे वास्तव्य

Tue Dec 22 , 2020
  सावनेर : आजनी शिवारात शेतात कापूस वेचण्याकरिता गेलेल्या मजुरांना पट्टेदार वाघाचे दर्शन झाले . वाघ दिसल्याने शेतकरी व शेतमजूर मजूर धास्तावले असून वनविभागाचे कर्मचारी वाघाचा शोध घेत आहेत . आजनी गावाजवळीत शेतात सकाळी कापूस वेचणीकरिता मजूर गेले असता दुपारी बाराच्या दरम्यान शेताजवळील नाल्याकाठावर वन्यप्राण्याची चाहूल लागली . शेतात कापूस […]

You May Like

Archives

Categories

Meta