आजनी , कोदेगाव शिवारात पट्टेदार वाघाचे वास्तव्य

 

जाहिरातीसाठी 7020602961

सावनेर : आजनी शिवारात शेतात कापूस वेचण्याकरिता गेलेल्या मजुरांना पट्टेदार वाघाचे दर्शन झाले . वाघ दिसल्याने शेतकरी व शेतमजूर मजूर धास्तावले असून वनविभागाचे कर्मचारी वाघाचा शोध घेत आहेत . आजनी गावाजवळीत शेतात सकाळी कापूस वेचणीकरिता मजूर गेले असता दुपारी बाराच्या दरम्यान शेताजवळील नाल्याकाठावर वन्यप्राण्याची चाहूल लागली . शेतात कापूस वेचत असणाऱ्या चंद्रकलाबाई राऊत या चाहूल कशाची आहे , म्हणून पाहायला गेल्या . त्यांना नाल्याकाठावर चे पट्टेदार वाघ दिसून आला . वाघाला बघून त्यांची बोलतीच बंद झाली . त्या घाबरून बेशुद्ध पडल्या .


त्यांच्या जवळच असलेल्या अनुसयाबाई राऊत यांनी आरडाओरडा कला . गावकरी गोळा झाले . दरम्यान , वाघ पळून गेला . त्वरित याबाबतची माहिती वन विभागाला देण्यात आली . वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली . वाघाचा शोध घेतला , पण त्याचा कुठेही थांगपत्ता लागला नाही . वनविभागाच्या पथकाने फटाके फोडले . कदाचित वाघ पुढे निघून गेला असावा , असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे . ग्रामीण भागात कापूस वेचणी तसेच शेतीच्या अन्य कामाकरिता शेतमजूर शेतात कामावर जाण्याची आता भीती व्यक्त करीत आहेत . गावकरी व वनकर्मचाऱ्यांनी वाघाचा शोधा सुरू केला . गेल्या आठवड्याभऱ्यापासून आजनी शिवारात याच वाघाने धुमाकूळ घातला होता . गेल्या दोन दिवसाआधी एका म्हशीच्या पिलाची वाघाने शिकार केल्याची माहिती आहे . आजनी शिवारातूनच सोमवारी कोदेगाव शिवारात या वाघाने प्रवेश केला . वनविभागाचे कर्मचारी या वाघाच्या हालचालीवर रात्रंदिन लक्ष ठेवून आहेत . नागरिकांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे , शेतात एकटे जाऊ नये , चार पाच जणांच्या गटाने जावे , वाघ कुठे आढळून आला किंवा त्याबाबत काही माहिती मिळाली असता तात्काळ वनविभागास कळवावे , गावकऱ्यांनी घाबरून जाऊ नये , असे आवाहन खापा वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एन.नाईक यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

पाराशिवनी तालुक्यातिल निवडणुक प्रक्रिया आज पासुनप्रारंभ१०ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर

Wed Dec 23 , 2020
*पाराशिवनी तालुक्यातिल निवडणुक प्रक्रिया आज पासुनप्रारंभ१०ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर* कमलसिह यादव पाराशिवनी तालुका प्रतिनिधी *पाराशिवनी* (ता प्र):-: तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असल्याने ग्रामीण भागातील राजकारण हळुहळु तापू लागले आहे. सरपंच पदाची आरक्षण सोडत सदस्य निवडीनंतर होणार असल्याने सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीवर डोळा ठेवून असणारांची गोची झाली आहे. मात्र […]

Archives

Categories

Meta