*कन्हान ला संत गाडगे बाबा यांची ६५ वी पुण्यतिथि साजरी*
विविध संघटने द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन
कन्हान – कन्हान परिसरात संत गाडगे बाबा यांच्या ६५ व्या पुण्यतिथी निमित्य विविध संघटने द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करुन संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत संत गाडगे बाबा यांची ६५ वी पुण्यतिथि साजरी करण्यात आली .
कन्हान शहर विकास मंच
कन्हान शहर विकास मंच द्वारे संत गाडगे बाबा यांच्या ६५ व्या पुण्यतिथी निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच मार्गदर्शक भरत सावळे यांच्या हस्ते संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथि साजरी करण्यात आली .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , उपाध्यक्ष महेंद्र साबरे , सचिव हरीओम प्रकाश नारायण , महासचिव सुरज वरखडे , कोषाध्यक्ष महेश शेंडे , सदस्य शुभम मंदुरकर , प्रकाश कुर्वे , शाहरुख खान , अक्षय फुले सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते
वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर
वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर द्वारे संत गाडगे बाबा यांच्या ६५ व्या पुण्यतिथी निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गहुहिवरा चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्या ने वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर सचिव शैलेश ढोके यांच्या हस्ते संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित प्रवक्ता रंजनिश ऊर्फ बाळा मेश्राम यांनी संत गाडगे बाबा यांचा जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकार्यांनी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथि साजरी करण्यात आली .
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी नागपूर जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र फुलझेले , शहर अध्यक्ष नितेश मेश्राम, सचिव शैलेश ढोके , प्रवक्ता रजनीश (बाळा) मेश्राम, नितीन पाटील, छोटेलाल माणिकपुरी , प्रमोद मिस्त्री सह आदि वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी उपस्थित होते .
गोंडवाना गणतंत्र पार्टी कन्हान शहर
गोंडवाना गणतंत्र पार्टी शाखा कन्हान शहर द्वारे राष्ट्रसंत गाडगे बाबा यांचा ६५ व्या पुण्यतिथी निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गहुहिवरा चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित गोंडवाना गणतंत्र पार्टी कन्हान शहर अध्यक्ष सोनु मसराम यांच्या हस्ते संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या पदाधिकार्यांनी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथि साजरी करण्यात आली .
या प्रसंगी गोंडवाना गणतंत्र पार्टी कन्हान शहर अध्यक्ष सोनु मसराम , उपाध्यक्ष पप्पूजी धारे ,
मानव विकास सेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शंकर ईवनाते , मुन्ना परानी , संदीप परते , अशोक रंगारी सह आदि गोंडवाना गणतंत्र पार्टी चे कार्यकर्ते व गावातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.