भक्तीस्थळांवर सभामंडप, लोकार्पण सोहळा रश्मी बर्वे यांच्या हस्ते

भक्तीस्थळांवर सभामंडप, लोकार्पण सोहळा रश्मी बर्वे यांच्या हस्ते

कन्हान,ता.२३ जानेवारी

     प्रभू श्रीरामचंद्राची प्राणप्रतिष्ठा या पवित्र दिनी ग्राम पंचायत टेकाडी (को.ख.) भक्तीस्थळांवर सभामंडप, सुशोभीकरणनाच्या १९ लक्ष रुपयांचे भूमिपूजन आणि १५ लक्ष रुपयांचे सभामंडपाचा लोकार्पण सोहळा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांच्या हस्ते पार पडला.

    १७ सामूहिक योजना व १५ वित्त आयोग जिल्हा परिषद निधी द्वारे ग्राम पंचायत सदस्य सतीश घारड यांच्या मागणी वरून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी ग्राम पंचायत टेकाडी प्रभाग क्रमांक २ येथे महाजन देव बाबा मंदिर येथे सभामंडप व सुशोभीकरनासाठी ५.५० लक्ष, श्री साई बाबा मंदिराला सुशोभीकरणाचे ८.५० लक्ष तर स्मशान भूमी करिता ५ लक्ष असा एकून १९ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.

   भूमिपूजन २२ जानेवारी रोजी मंदिर परिसरात करण्यात आले. प्रसंगी मोठ्या संख्येत महिलांचा सहभाग होता. गणेश मंदिर व श्री राम मंदिर येथे १५ लक्ष रुपयांच्या निधीतून नवनिर्मित सभामंडपाचे लोकार्पण आणि भूमिपूजन रश्मी श्यामकूमार बर्वे यांच्या हस्ते करण्यात आले.

     प्रसंगी प्रमुख उपस्थिती उपसभापती कु.करूना भोवते, ग्राम पंचायत सदस्या संध्या सिंह, गीता कश्यप, सदस्य कुणाल वासाडे, सतीश घारड यांच्या सह सुशिलाबाई राऊत, लीलाबाई पारधी, शोभाबाई उमप, कल्पना लक्षणे, सुधा हुड, सुनिताताई मरघडे, आशाबाई गाडगे, फुलवंताबाई वासाडे, इंदिरा वासाडे, लिला आकोटकर, पार्वता कडू, सारिका वासाडे, विमलाबाई कामडे, अंजली उमाळे, निर्मला हुड, बेबी राऊत, मैना राऊत, शकुंतला गाडगे, कलावती देवुळकर,पार्वता भलावी, कमला भुते, उर्मिला कोलते, कमलाबाई धोटे, राजश्री अटाळकर, सविता आकोटकर, पुरुषोत्तम मोहाडे, शिवणारायन आकोटकर, प्रवीण चव्हाण, आकाश कडू, कमलाकर राऊत, ज्ञमारोती हूड, दिवाकर उमाळे, अशोक राऊत, भूषण खोरे, सुरेश हूड, मारोती हूड, शिवणारायन आकोटकर, नंदकिशोर अटाळकर, सचिन भोयर, पुनम भोवते, सौरव बोरकर,विशाधर कांबळे, विवेक डेंगे,अनुज कांबळे, रमेश सावरकर, दिलीप उमप, सौरव बोरकर, मनोज मोहाडे, सुधाकर वासाडे यांच्या सह मोठ्या संख्येत ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कामाक्षी सेलिब्रेशन तर्फे रामलला प्राणप्रतिष्ठा निमित्त भव्य महाप्रसाद

Tue Jan 23 , 2024
सावनेर :  कामाक्षी सेलिब्रेशन सावनेर येथे, अयोध्या मधील श्रीराम भगवान यांच्या प्राणप्रतिष्ठा समारोहाचे निमित्त साधून, दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत, भव्य महाप्रसादाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. याद्वारे सर्व भाविक मंडळींना पंचपक्वान्नाचा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण भारतवर्षामध्ये श्रीराम भगवान यांच्या प्राणप्रतिस्थापनेमुळे जे ईश्वरीय वातावरण निर्माण झालेले आहे, त्याचा […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta