वीज वितरण कंपनीव्दारे नागरिकांना वीजेची भरपाई देणार का? ग्रामीण भागातील नागरिक अंधारात राहून उकाड्यामुळे त्रस्त विद्युत बिल भरण्यास उशीर झाल्यास दंड वसुलीचे आदेश 

वीज वितरण कंपनीव्दारे नागरिकांना वीजेची भरपाई देणार का?

ग्रामीण भागातील नागरिक अंधारात राहून उकाड्यामुळे त्रस्त विद्युत

बिल भरण्यास उशीर झाल्यास दंड वसुलीचे आदेश

कन्हान,ता.२३ मे

     शहरासह ग्रामीण भागात व परिसरात कुठलेही वादळ वारा नाही, पाऊस नाही तरी भर उकाडयातील प्रखर तापमानात दिवस व रात्र विद्युत पुरवठा सतत खंडीत होऊन तपत्या उकाडयात गावातील लहान मुले आणि आजारी व्यक्तीला जीवन जगणे कठीण झाले आहे. विजेच्या लंपडवामुळे पाणी व दळण जीवनावश्यक वस्तू मिळणे बंद झाले असल्याने त्रस्त झाले आहे. यांची नुकसान भरपाई वीज वितरण कंपनी देणार का? असा संतप्त प्रश्न नागरिकांनी केला आहे.

      विद्युत महामंडळ असताना ग्राहकांना विद्युत पुरवठा करतांना दिरंगाई व विद्युत लाईनचा लपंडावामुळे ग्राहकांना नागरिकांना भयंकर त्रास होऊन तक्रारी भरपुर वाढल्या. मागिल सरकारने ग्राहकांना विद्युत पुरवठा व्यवस्थित व्हावा याकरिता महामंडळाचे खाजगीकरण करून महावितरण कंपनी करून सुरूवातीला विज दर वाढुन पाच वर्ष व्यवस्थित ग्राहकांना विद्युत पुरवठा केला. राज्यकर्ते बदलताच महावितरण कंपनीचे कामे सुध्दा महामंडळा सारखीच होत आहे. त्यावेळी नागरिकांचे म्हणणे ऐकुण तरी घेत होते. परंतु सध्या विद्युत अधिकारी व‌ कर्मचारी फोन उचलत नाही. दोन तीन महिने बिल न भरल्यास विशेष वसुली पथक पोहचुन बिल भरण्यास दबाव टाकतात. नाही भरल्या गेले तर लाईन खांबावरून बंद करतात. एक महिना बिल न भरल्यास दुस-या महिन्यात दंडासह बिल वसुल करण्यात येते. या उकाडयात पाहीजे तसा विज पुरवठा न करता वारंवार दिवसांनी व रात्रीला विद्युत लाईन मध्ये बिघाड होऊन तासोन तास विद्युत पुरवठा खंडीत होऊन नागरिकांना व कुंटुबातील छोटया मुलांना भयंकर त्रास सहन करावा लागतो. कन्हान शहरात नित्याची बाब होऊन ग्रामिण भागात तर दिवसा तीन-चार तास तर रात्रभर विद्युत लाईन बंद राहत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. विद्युत जोडणी घेते वेळी सुरक्षा ठेव जमा केल्यावरही आता नव्याने दर दोन वर्षाने १ ते ४ हजार रूपये प्रमाणे सुरक्षा ठेवी म्हणुन विज ग्राहका कडुन का घेण्यात येत आहे.या विद्युत मंडळाचे खाजगीकरण करून फक्त कंत्राटदारांचे हित जोपासले जात आहे का ?

      नागपुर जिल्हातील नैसर्गिक संपत्ती पाणी, कोळसा, वातावरण व औष्णिक विज निर्मिती क्रेंद असुन येथील नैसर्गिक साधन संपतीचा व्हार्स होऊन या सर्वाचे दुषपरिणाम जिल्हा व विदर्भवासियांना भोगावे लागुन कँन्सर सारख्या दुर्धर आजारांने मुत्युचे प्रमाण सुध्दा जिल्हयात वाढत आहे. कोळसा खाणी, विद्युत निर्मिती केंद्रामुळे नागपुर व चंद्रपुर जिल्हा तापमानात जगात उंच्चाक गाठत आहे. ऐवढे सर्व दुषपरिणाम भोगुन सुध्दा नागपुर जिल्हयातील ग्राहकांना ४. ४१ ते १५.५७ रूपये युनिट विज आकार, स्थिर आकार, वहन आकार, विज शुल्कासह बिल द्यावा लागतात. ९०० किमी लांब मुंबई, पुणे शहराला विद्युत पुरवठा करण्यास जास्त खर्च व तेथील नागरिकांना कुठलेही दुष्यपरिणाम न भोगता त्याच दरात विद्युत पुरवठा केला जातो. हा नागपुर जिल्हा वासीयांशी अन्यायच केला जात आहे की नाही ? नागपुर जिल्हयातील कोळसा खाणी, विज निर्मिती केंद्राने नागरिकांना पाणी, कोळसा, राखेच्या प्रदुर्शनाने उष्णतेत वाढ होऊन विविध आजाराचे दुषपरिणामाचा सामना करावा लागतो. ऐवढे सर्व असुन जर कन्हान शहरात व ग्रामिण भागात तपत्या भर उन्हाळयात वारंवार सतत विद्युत पुरवठा खंडीत होत असतो परंतु विद्युत बिल दर महिन्याला जास्तच येतात. त्यात तासोन तास खंडित विजेचे बिल कमी होत‌ का नाही. महावितरण कंपनीमुळे ग्राहक नागरिकांना होणा-या भयंकर त्रासाची नुकसान भरपाई महावितरण देणार का ? अशी ‌सर्वत्र नागरिकांच्या संतप्त चर्चेला ऊत येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शहरात वीज पुरवठा नियमित करण्यात यावा शहर युवक काँग्रेसची निवेदनातून मागणी. 

Tue May 23 , 2023
शहरात वीज पुरवठा नियमित करण्यात यावा शहर युवक काँग्रेसची निवेदनातून मागणी. कन्हान, ता.२३    शहरात मागील कित्येक दिवसा पासुन दिवस-रात्र वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाल्याने कन्हान शहर युवक काँग्रेस अध्यक्ष आकिब सिद्धिकी च्या नेतृत्वात कन्हान महावितरण कार्यालया चे उप मुख्य अभियंता मा. भगत साहेब यांची […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta