मणिपूर येथे घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध, मुक मोर्चा  काँग्रेस कमेटी महिला आघाडीच्या नेतृत्वात मुक मोर्चा 

मणिपूर येथे घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध, मुक मोर्चा

काँग्रेस कमेटी महिला आघाडीच्या नेतृत्वात मुक मोर्चा

कन्हान,ता.२२ जूलै

    कन्हान शहर काँग्रेस कमेटी महिला आघाडीच्या पदाधिकर्यांनी मणिपुर येथे घडलेल्या घटनेचा विरोध दर्शविला. राजेंद्र मुळक सहाय्यता कक्ष सेंट्रल बँक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत हातावर काळी पट्टी बांधुन मुक मोर्चा काढला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मेणबत्ती लाऊन घटनेचा निषेध करून मणिपुर सरकार बर्खास्त करण्याची मागणी केली आहे.

   मणिपूर मध्ये गेल्या अडीच महिन्यां पासून हिंसाचार सुरू आहे . दरम्यान दोन स्त्रियांना निर्वस्त्र करून धिंड काढून त्यांच्या देहाची विटंबना करत सामुदायिक बलात्कार केला गेला. मानवतेला काळीमा फासणारी आणि क्रौर्याची परिसीमा गाठणारी ही घटना उशिरा उघड झाल्यावर ही देशातले मख्ख मुर्दाड आपल्याच तालात दंग असुन हे चित्र विलक्षण संतापजनक आणि घृणास्पद आहे.

    मणिपूर मधील घटना केवळ एक गुन्हा नसून घाणेरड्या मानसिकते च्या लोकांची क्रुरता समोर आहे. जवळपास अडीच ते तीन महिन्याचा कालावधी होऊन ही केंद्र आणि राज्य सरकार परिस्थिती वर नियंत्रण मिळवु शकले नाहीत. हिंसाचारात आतापर्यंत १४० लोकांचा मृत्यू झाला असुन ३०० लोक जख्मी झाले आहे . मणिपुर येथे घडलेल्या घटनेने संपुर्ण देश हादरले असुन प्रत्येक महिलांच्या भावना दुखविल्याने कन्हान येथे शहर काँग्रेस कमेटी महिला आघाडी च्या पदाधिकर्यांनी अध्यक्ष सौ.रिता बर्वे यांच्या नेतृत्वात मणिपुर येथे घडलेल्या घटनेच्या विरोधात हातावर काळी पट्टी बांधुन मुक मोर्चा काढुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मेणबत्ती लाऊन घटनेचा निषेध करुन मणिपुर सरकार बर्खास्त करण्याची मागणी केली आहे.

   प्रसंगी कन्हान-पिपरी नगरपरिषद नगरसेविका रेखा टोहाने, नगरसेविका गुफा तिडके, नगरसेविका पुषा कावळकर, मीना वाटकर, सविता बावणे, मीना ठाकूर, माया वाघमारे, शैला राऊत, मंदा बागडे, पुष्पां भेलावे, सुनंदा कठाने, वंदना बागडे, भूमिका बोरकर, झुही बागडे, शीतल पाटील, दिपाताई शेंडे, कल्पना ठाकूर, राधिका खडसे, कांचन धावडे, अनिता मेश्राम , मालती विश्वकर्मा , मालती महले, स्नेहा पाली, सुनीता डेहरिया, शिला मेश्राम, शहर युवक काँग्रेस कमेटी अध्यक्ष आकिब सिद्धिकी, गौतम नितनवरे, शरद वाटकर, अजय कापसीकर, आनंद चकोले, प्रदीप बावणे, कुणाल खडसे, निखिल तांडेकर, शेखर बोरकर, महेश धोंगडे, ऋषीकेश हावरे सह आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

गजानन महाराज मंदिरात चोरी : शान पथक पाचारण

Wed Jul 26 , 2023
गजानन महाराज मंदिरात चोरी* *डाग स्कॉट पाचारण * सावनेर – सावनेर शहरात चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून एकीकडे दिवसेंदिवस चोरीच्या घटना घडत असून नागरिकांच्या जीवित व मालमत्तेची भीती व्यक्त होत आहे.  दुसरीकडे स्थानिक पोलिसांच्या रात्रीची गस्त आणि नाकाबंदीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. * काही महिन्यांपूर्वी चोरट्यांनी अनेक दुकानांना […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta