गोंडेगाव च्या अश्विन कडनायके बीएसएफ मध्ये नियुक्तीने अभिनंदनाचा वर्षाव

गोंडेगाव च्या अश्विन कडनायके बीएसएफ मध्ये नियुक्तीने अभिनंदनाचा वर्षाव

कन्हान,ता.२३ ऑगस्ट

    पारशिवनी तालुक्यात असलेल्या गोंडेगावातील तरूण युवक अश्विन कडनायके याने हलाखीच्या परिस्थिती वर मात करित अभ्यास व मेहनत करून देश सेवेचे ध्येय गाठत बीएसएफ मध्ये नियुक्ती झाल्याने ग्रा.प.गोंडेगाव व ग्रामस्थांनी त्याचे कौतुक करून अभिनंदनाच्या वर्षाव केला आहे.

     गोंडेगाव येथील तरुण युवक अश्विन भगवान कडनायके यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असली तरी सुद्धां त्या परिस्थितीला मात करित उत्तम अभ्यास व मेहनत करून बीएसएफ मध्ये नियुक्त झाली.

त्यांनी आपले देश सेवेचे ध्येय साध्य केल्याने गोंडेगाव ग्राम पंचायत सरपंचा सौ.मनिषा अशोक दलाल, ग्रा.प. सदस्य साहिल गजभिये, प्रीतम राऊत, अजय दलाल, विजय बोढारे, गोपाल राऊत, रामु बोढारे आदी नी त्याचे घरी जावुन अश्विन कडनायके, आई कल्पना, वडिल भगवान कडनायके यांचे पुष्पगुच्छाने अभिनंदन करून पुढील उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.

तसेच राजकुमार महल्ले, सुर्यभान फरकाडे, जीवलग पाटील, मोरेश्वर शिंगणे, रविंद्र कनोजे, प्रीतम राऊत, दिपक अरूकर, मधुकर चौधरी, पंकज गोडाणे, हरिदास पहाडे, संजय मेश्राम, प्रकाश हुकूम, श्यामलाल प्रधान, अर्जुन गजभिये, कुणाल नाईक, मंगेश महल्ले, सोनु पाटील, अनिकेत भोयर, आयुष भडंग, अजित सहारे, अभिषेक कडनाईके, अनिकेत देशभ्रतार सह ग्रामस्थांनी अश्विन कडनायके यास पुष्पहार व पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या असुन परिसरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

उमरेड येथे सर्व स्तरिय कलाकार मेळावा संपन्न शा.राजेंद्र भीमराव बावनकुळे यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत 

Wed Aug 23 , 2023
उमरेड येथे सर्व स्तरिय कलाकार मेळावा संपन्न शा.राजेंद्र भीमराव बावनकुळे यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत उमरेड,ता.२३ ऑगस्ट     एकता बहुउद्देशिय मंडळ उटी (चांपा) वतीने लोककला सांस्कृतिक राष्ट्रीय संगीत परिषद तालुका समिती, उमरेड साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती निमित्य एक दिवसीय सर्व स्तरिय कलाकार मेळावा नुकतेच विठोबा सभागृह, […]

You May Like

Archives

Categories

Meta