ज्येष्ठ नाट्यकर्मी व विदर्भ शा. क. परिषदेचे अध्यक्ष स्व. धर्मदास भिवगडे यांना श्रद्धांजली

.ज्येष्ठ नाट्यकर्मी व विदर्भ शा. क. परिषदेचे अध्यक्ष स्व. धर्मदास भिवगडे यांना श्रद्धांजली

#)  विदर्भ शाहीर कलाकार परिषदे व्दारे अध्यक्ष स्व. भिवगडे यांना श्रद्धांजली अर्पण. 


कन्हान : –  विदर्भ शाहीर कलाकार परिषदेच्या ग्रामि ण पारंपारिक लोककलावंताच्या वतीने हार्दिक मंगल कार्यालय कन्हान येथे श्रध्दाजंली कार्यक्रमाचे मान्यव रांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करून विदर्भातील लोक कलावंतानी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष स्व. धर्मदास भिवगडे हयाना भावभिन श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. 

        शालेय जिवनापासुन नाटय कलावंत म्हणुन सुरू वात करून नाटयकर्मी पर्यंत मजल गाठत असताना विदर्भातील लोककला ही लोप पावत असल्याचे त्यां च्या निदर्शनात आल्याने त्यांचे मुळ कारण शोधत अस ताना त्यांच्या लक्षात आले की, पारंपारिक लोककला जोपासणारा ग्रामिण भागातील लोक कलावंत असुन त्याचीच दैनाअवस्था होत असल्याने विदर्भातील पारं पारिक लोककला ही मागे पडुन लोप पावत होती. हेच शल्य जाणुन पारंपारिक लोककला जोपासण्याकरिता ग्रामिण लोककलावंताना जगवावे लागणार या सार्थ हेतुने धर्मदास भिवगडे हयानी १२ ऑगस्ट २००७ ला विदर्भ कलाकार परिषदेची स्थापना करून खेडोपाडी, गावोगावी फिरून सुप्त व निरस्त अवस्थेत असलेल्या कलावंताना एकत्र करून त्यांच्या कलेचे महत्व त्यांना सांगुन आधुनिक काळानुरूप ग्रामिण लोककलेचे साद रीकरणा विषयी योग्य मार्गदर्शन करून शासन दरबारी पारंपारिक लोककला जोपसण्याकरिता ग्रामिण लोक कलावंताना प्रशिक्षण व प्रोत्साहित करून संधी सरका र तर्फे उपलब्ध करण्याकरिता कलावंताच्या समस्येचा रेटा लावुन लोक कलावंताना न्याय मिळवुन देण्याचा सतत लढा देत लोककलावंताना त्याच्या हक्काची जाणीव करून संधी व प्रोत्साहनपर मानधन मिळवुन देण्यास विदर्भ शाहीर कलाकार परिषदेच्या माध्यमातु न मौलिक कार्य केल्याने विदर्भातील लोक कलावंत उभा होऊ लागल्याने व नवसंजिवीनी मिळाल्यामुळेच विदर्भ शाहीर कलाकर परिषदेच्या ग्रामिण लोक कला वंतानी कृत्यज्ञत: म्हणुन स्व. धर्मदास भिवगडे यांचा श्रध्दाजंली कार्यक्रम हार्दिक मंगल कार्यालय कन्हान येथे राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री मा. श्री सुनील बाबु केदार साहेब, जि प अध्यक्षा रश्मीताई बर्वे ,प स सभापती मिनाताई कावळे, पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे, कामगार नेते एस क्यु जामा, सुनिल रावत, कॉग्रेस तालुकाध्यक्ष दयारामजी भोयर, दुधराम सवालाखे, डॉ. रामसिंग सायरे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित विदर्भातील नागपुर, वर्धा ,भंडारा, गोंदिया,चंद्रपुर, यवतमाळ,अमरावती,अकोला आदी जिल्हयातील ग्रामिण लोककलावंतानी आपल्या पारंपारिक लोककला सादर करून स्व.भिवगडे याना  भावभिन श्रध्दाजंली अर्पण केली. पारंपारिक लोकक लेच्या माध्यमातुन ग्रामिण भागात लोक कलावंत हा समाजातील वाईट प्रथा, अंधश्रध्दा व घातक विचार धारेवर मारा करून शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक, देश हितार्थ समाज प्रबोधनाचे मौलिक कार्य करित असल्याने या लोक कलावंताच्या अडसर येणा-या सम स्या त्वरित सोडवुन न्याय देण्याचे मा. मंत्री केदार यां नी ग्रामिण कलावंताना आश्वस्त केले. विशेष म्हणजे  सांस्कृतिक कार्य विभाग नागपुरचे सहाय्यक संचालक मा. संदीप शेंडे हयानी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे स्व. भिवगडे हयाना श्रध्दाजंली अर्पण करून कलावंताना सहकार्य करण्याची हमी दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचा लन शाहीर अंलकार टेभुर्णे यांनी तर आभार नगरसेव क मनिष भिवगडे यांनी व्यकत केले. यशस्वितेकरिता विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे जिल्हा व तालुका अध्यक्ष अरुण वाहने, राजकुमार घुले, वसंता कुंबरे, डॉ पारधी, नामदेव ठाकरे, जगन ठाकरे, धनगरे,.मनिष भिवगडे, राहुल लांजेवार, दशरथ बावणे, सुधिर लांजे वार, जगदीश देव्हारे, मिलिंद खोब्रागडे, चुडामनजी लांजेवार, रामटेके, महिला प्रतिनिधी ज्योतीताई वाघाये ,तुळसाबाई देशमुख, विद्याताई लंगडे, उर्मिला तेलंगरा व, पी एम डांगोरे सह विदर्भातील लोककलावंतानी मौलाचे सहकार्य केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

प्रगती नगर क्रांन्दी येथील प्लाॅटधारकांचा फसवणूकीचा आरोप

Thu Sep 23 , 2021
*प्रगती नगर क्रांन्दी येथील प्लाॅटधारकांचा फसवणूकीचा आरोप *सरकारी जागेवर लेआऊट टाकून केले विक्रीपत्र *एसडीओ व तहसीलदार यांचा कडे तक्रार दाखल *आमदार आशीष जयस्वाला कडे यांचा न्यायाची मागणी कन्हान ता 21 सप्टेंबर मौजा क्रांन्दी व सिहोरा येथील सरकारी जागेवर (शीवधुरावर)आपली मालकी हक्क दाखून प्लॉट पाडुन प्लाॅट धारकासोबत प्लाॅट मालीक राजेश यादव […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta