प्रगती नगर क्रांन्दी येथील प्लाॅटधारकांचा फसवणूकीचा आरोप

*प्रगती नगर क्रांन्दी येथील प्लाॅटधारकांचा फसवणूकीचा आरोप

*सरकारी जागेवर लेआऊट टाकून केले विक्रीपत्र
*एसडीओ व तहसीलदार यांचा कडे तक्रार दाखल
*आमदार आशीष जयस्वाला कडे यांचा न्यायाची मागणी

कन्हान ता 21 सप्टेंबर
मौजा क्रांन्दी व सिहोरा येथील सरकारी जागेवर (शीवधुरावर)आपली मालकी हक्क दाखून प्लॉट पाडुन प्लाॅट धारकासोबत प्लाॅट मालीक राजेश यादव यांनी क्रांदी ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांनाही अंधारातठेवून खोटा नकाशा व लेआऊट मंजूरकरून प्लाॅट विकुन धोकाधाडी केल्याचा प्रगतीनगर येथील नागरिकांनी पत्र परिषदेत पूरावे सादरकरीत आरोप केला.
पत्रपरिषदेत सांगीतले की, क्रांन्दी (गुजर) अंतर्गत सर्वे नं.240 या शेतीमध्ये 38 प्लाॅट पाडुन राजेश डोकवडी कल्पे (यादव) व संजु डोकवडी कल्पे (यादव) दोघेही रा.गांधी चौक, रेल्वेस्टेशन रोड, कन्हान. यांनी कांन्द्री सिहोरा शिव धुर्यावर आपले मालकी हक्क दाखून प्लॉट पाडून प्लॉट धारकासोबत धोकाधाडी केली. त्यांची जमीन सर्वे नं. 240 सातबारा प्रमाणे आरजी 0.75 हेक्टर आर (7500 चौ.मीटर) मंजेच 80,730 चौरस फूट जागा होतो. मात्र कांद्री ग्राम पंचायतचे सरपंच आणी सचिव यांना धोक्यात ठेऊन दिनांक 19 मे 2006 च्या मासिकसभेत ठराव क्र.अनुसार नवीन ले-आउट मंजूर नकाशा मध्ये 0.83 हेक्टर आर.( ८३०० चौ.मीटर) म्हणजेच अंदाजे 90490 चौ.फुटा मध्ये प्लॉट व रोड पाडून प्लॉट धारकाना विकले आहे.
यासोबतच उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात कृषिक शेतीला अकृषिकची करण्याकरिता दि.9 मे 2005 रोजी ला सर्वे न.240 सातबारा 0.75 आराजी (7500 चौ.मीटर) 80730 चौ.फुट, जागा निवासी वापरा करिता ले-आउट नकाशा मध्ये बदल करून शासन सोबत धोकाधाडी करून निवासी करिता अकृषीकची मंजरी घेण्यात आली आहे.
तलाठी यांचा माहितीअनुसार शिवधुरा 50 फुटाचा असतो. सर्वे न. 240 सातबारा 0.75 हेक्टर आर मध्ये प्लाॅट 0.60 हेक्टर आर ( 6000 चौ.मीटर) इतक्या जागेत ले- ऑउत पाडायला हवे होते. परंतु त्या वेळेस असलेले तलाठी आपल्या हाताथ घेऊन कांद्री-व सिहोरा व शिवधुयोचा बाजूला ले- आउट टाकण्याचा नियमा प्रमाणे 7.5 चौ. मिल जागा न सोडता सुक्षृत गृहनिर्माण संस्था व्दारे सोडलेल्या जागेवर सुद्धा आपला मालकी हक्क दाखून गोर गरीब नागरिकांना फसवून त्यांचा कडून हजारो रुपये घेऊन सरकारी दोन्ही जाग्यात प्लॉट घेऊन धोकाधाडी केलेली आहे. तसेच पूर्ण शिवधुऱ्यावर कब्जा करून प्लॉट विकल्याने कास्तकाराचे जाने येणे बंद झालेले आहे. यांची तक्रार जिल्हाअधिकारी नागपूर, उपविभागीय अधिकारी रामटेक, तहसिलदार पारशिवनी. अध्यक्षा जि. प. नागपूर , आमदार आशीष जयस्वाल रामटेक, सरपंच व सचिव कांद्री ,नगराध्यक्ष नगर परिषद कन्हान, मंडळ अधिकारी कन्हान, ठाणेदार पोलिस स्टेशन कन्हान यांना दिलेले आहे. परंतु शासनाचे अधिकारी कासव चालणे चालत असल्याचे प्रगतीनगर यांचे म्हणे आहे. यावेळी पत्र परिषद मध्ये अशोक पाटील श्रवण वतेकर, रतीराम सहारे माझी सरपंच, दतु खडसे, सुरेश चावके, सुरेश यादव, योगराज औसरे, मंगेश गजभिये, नीलकंठ गजभिये, शिवा हावरे, राजकुमार मेश्राम, पदमाकर वासनिक,सुभाष रोकडे, नरेश सोनेकर, सुभाष ढोके, सुरेश शेन्दे, सूर्यनारायण संभोजी आदि नागरिक गण उपस्थित होते.


बलवंत पडोळे ,(सरपंच क्रान्दी ग्रामपंचायत )
प्रगती नगर क्रांन्दी येथे ले-आउट आदीचा कार्यकाळात मंजुर झालेला आहे. सात बारा मध्ये 75 आराजी असल्यावर देखील 90 आरजी मध्ये ले-आउट पाडुन विक्री केली असल्याचे स्पष्ट झाल्याने ग्रामपंचायत वतीने पाठपुरावा करून तहसीलदार व एच डी ओ यांचा कडे तक्रार केली असुन योग्य ते कारवाई पुढील कारवाई करू तसा ग्रामपंचायत ठरावात सुध्दा घेतले आहे.
———

प्रशांत सांगोडे (तहसीलदार पारशिवनी )
प्रगतीनगर मौजा क्रांन्दी येथील प्रकरणाची तक्रार तहसील कार्यालयात आलेली आहे. त्या लेआऊटची आदी सर्व प्रथम मोजणी करू आणी मोजणी केल्यानंतर मोजणी निष्कर्ष निघेल त्यावर योग्य कारवाई करेल.
—-

राजेश यादव ( लेआउट मालक)
प्रगती नगर मध्ये ले-आउट हा कन्हान नगरपरीषद हददीत काही संबंध नसुन क्रान्दी ग्रामपंचायत मध्ये येतो. पाडलेला लेआउट मध्ये शीवधुरा पासुन रस्ताचा उल्लेख कांद्री ग्राम पंचायत, पटवारी व तहसीलदार यांचा नकाशावर कुठेही नाही.आपला लेआऊट नीयम बाह्य नसुन त्याला सर्व विभागात मार्फ नहरकत प्रमाणीत आहे. शीवाय लेआऊटची एनेची काॅफी सुध्दा मिळाली आहे. आरोप केलेल्या व्यक्तीने सीध्द केल्यास योग्य कारवाई बाध्य राहील.लेआऊट संबधीत माझाकडे शासकीय पुरावे असुन सादर करण्यास कधीही सश्रम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

दुचाकी व ट्रक अपघातात दुचाकी चालकाचा मुत्यु

Thu Sep 23 , 2021
दुचाकी व ट्रक अपघातात दुचाकी चालकाचा मुत्यु कन्हान : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील पंच बालाजी देवस्थान समोर नादुरूस्त उभ्या ट्रक कुठलेही सुरक्ष निरदेर्शक न लावल्याने नागपुर वरून कन्हान मार्गाने रामटेक कडे जाणा-या दुचाकी चालक ला अंधरात ट्रक दिसुन न आल्याने ट्रक मध्ये दुचाकी  धडक ट्रक खाली गेल्याने मनिष नागोत्रा चा  झालेल्या अपघातात मुत्यु […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta