- *शिवशक्ती आखाडा आयोजित नवरात्री उत्सव
*मासिकपाळी श्राप कि योगदान
कन्हान ता.23
शिवशक्ती आखाडा बोरी येथे मासिकपाळी श्राप कि योगदान कार्यक्रम नवरात्रीचा निमीत्य दुसऱ्या दिवशी घेण्यात आला. या कार्यक्रमला प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे उपस्थित होत्या. याप्रसंगी मासिक पाळी या विषयावर मार्गदर्शन करायला पंचायत समिती ट्रेनर अनिता दुबळे, नीता पोटफळे व महिमा शेंडे उपस्थित होत्या. बोरी या गावातील महिलां तसेच मुलींना एकत्र आणून त्यांना शिवशक्ती आखाडा येथे मार्गदर्शन केले. मान्यवारांनी मासिक पाळी ही श्राप नसून महिला आणि मुलींना मिळालेलं योगदान आहे या विषयावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमला शिवशक्ती आखाडा प्रमुख पायल येरणे, निकिता येरणे, निर्मला येरणे, प्रियांका येरणे आदी मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित होत्या.