*भिलगाव येथे विजबिल स्वीकृति केंद्राचे उद्घाटन*

कामठी : भिलगाव येथील विज ग्राहकांना वीज देयके भरण्यासाठी मोठी अडचण होत होती. ही अडचण लक्षात घेऊन भिलगाव येथे विद्युत मंडळाचे विज बिल स्विकृती केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री व नागपुर जिल्हा पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांच्या हस्ते व नागपुर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांचा प्रमुख उपस्थिती मधे करण्यात आले.
नागपूर जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव व भिलगावचे सामाजिक कार्यकर्ते निखिल फलके व माजी उपसरपंच चंद्रकांत फलके , भिलगाव काँग्रेस अध्यक्ष खिमेश बढिये यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज भिलगाव मधे विज बिल स्वीकृती केंद्र देण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष कामठी शकुर नागाणी, माजी उपाध्यक्ष व नगरसेवक कामठी काशीनाथ प्रधान, नगरसेवक कामठी नगरपरिषद निरज लोणारे, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सचिव अनुराग भोयर, महावितरण अधिकारी आमझरे , राठोड, यांच्यासह भिलगाव काॅगेसचे पदाधिकारी माजी उपसरपंच चंद्रकांत फलके, युवक काँग्रेसचे महासचिव निखिल फलके, भिलगाव काॅगेसचे अध्यक्ष खिमेश बढिये,भिलगाव ग्राम पंचायत सदस्य ज्योस्तनाताई ज्ञानवटकर, धर्मराज आहाके, कवठा ग्रामपंचायत सरपंच शरद माकडे, कामठी तालुका सेवादल काँग्रेस अध्यक्ष किशोर धांडे , इमरान खान, अर्जुनजी रोकडे, युवक कांग्रेस येरखेडा भिलगाव जि.प. अध्यक्ष योगेश ढोकणे, अरविंद पालीवाल, अफसर खान,अनीकेत शेलके, प्रणय गायकवाड, चंदू गोंडाणे,फैजान रशीद, मनोहर चौधरी, वसंता चौधरी, विवेक वासनीक, रुपेश मानकर,सिद्धार्थ बागडे ,रिन्कू खैरकर, तीरपुडेजी, वाघधरेजी, उकेजी,लोकेश पटले, घनश्याम पटले,शब्बीर शेख, देवदत्त गौरखेडे, अक्षय खांडेकर व भिलगाव मधील नागरिक उपस्थित होते