तलवार घेऊन धुमाकुळ घालणाऱ्याला अटक

तलवार घेऊन धुमाकुळ घालणाऱ्याला अटक

कन्हान,ता.२२ डिसेंबर

‌‌  पोलीस स्टेशन अंतर्गत प्रगती नगर, सुपर टाऊन, कन्हान येथे अवैधरित्या तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी धुमाकुळ घालत फिरणारा आरोपी जिगर कनोजिया याला स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथक पोलीसांनी पकडुन त्यांच्या जवळुन तलवार जप्त करून त्यांचा विरुद्ध गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले.

     प्राप्त माहिती नुसार, बुधवार (दि.२१) डिसेंबर ला सायंकाळी ७ ते ७.४५ वाजता दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिणचे स.पो.नि अनिल राऊत आपल्या सहकर्मी पथकासह कन्हान उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त माहितीनुसार, प्रगती नगर, सुपर टॉऊन येथे युवक तलवार घेऊन सार्वजनिक स्थळी धुमाकुळ करतो आहे. मिळालेल्या बातमीप्रमाणे राम जामकर यांच्या घरा शेजारी खुल्या जागेत एक युवक हातात तलवार घेवुन दिसला. जिगर राजेश कनोजिया (वय २३) रा.प्रगती नगर, सुपर टाऊन, कन्हान त्याला ताब्यात घेवुन त्याच्या जवळ असलेली एक पांढ-या धातुची तलवार किंमत एक हजार रूपयांची जप्त करून पोस्टे ला पो.ह.वा गुरूप्रसाद मेश्राम च्या तक्रारीने आरोपी जिगर राजेश कनोजीया (वय-२३) रा.प्रगती नगर सुपर टाऊन यांचे विरुद्ध अप क्र ४८०/२२ कलम ४,२५ भा.ह.का अन्वये गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही करीता कन्हान पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

    सदर कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण चे पो.नि.ओमप्रकाश कोकाटे यांचे मार्ग दर्शनात सपोनि.अनिल राऊत, पो.हवा. विनोद काळे, नाना राऊत, पोना प्रणय बनाफार, वीरेंद्र नरड, चालक पो हवा. ज्ञानेश्वर पाटील आदीने यशस्विरित्या पार पाडली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

संताजी जगनाडे महाराज यांची ३२३ वी पुण्यतिथि साजरी

Fri Dec 23 , 2022
संताजी जगनाडे महाराज यांची ३२३ वी पुण्यतिथि साजरी कन्हान,ता.२२ डिसेंबर.    कांद्री येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची ३२३ वी पुण्यतिथि साजरी करण्यात आली .    कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित नवनियुक्त तैलिक महासभा जिल्हाध्यक्ष मा.योगेश वाडीभस्मे यांच्या हस्ते श्री‌ संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण आणि दीप […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta