कन्हान कांद्री शहरातील बहुतेक एटीएम ठरत आहे पांढरा हत्ती  

कन्हान कांद्री शहरातील बहुतेक एटीएम ठरत आहे पांढरा हत्ती

कन्हान : – शहरात बॅकेचे एटीम लावण्यात आले परंतु बहुतेक मध्ये नेहमी “नो कॅश” चे फलक असल्याने नागरिकांना संपुर्ण फेरफटा मारल्यावरच एक दोन बँकेच्या एटीएम मध्येच पैसे मिळतात. यामुळे नागरिकांना मनस्ताप होऊन शहरातील एटीएम पांढरा हत्ती ठरत आहे.  

       कन्हान ते कांद्री शहरातील राष्ट्रीय चारपदरी महामार्गावर व लगत पाच नॅशनल बॅंका असुन नॅशनल व खाजगी बॅकेचे १० एटीएम तर तारसा रोडवर दोन एटीएम लावण्यात आले. यात शनिवार, रवीवार व सुटीच्या दिवसी तर बहुतेक पैसे नसतात परंतु कामकाज चालु दिवसात व रात्री सुध्दा महत्वाच्या कामाकरिता पैसे काढण्याकरिता शहराचा फेरफटका मारावा लागत मानसिक त्रास सहन करावा लागतो. या बाराही एटीएम पैकी फक्त पंजाब बॅकेच्या एटीएम मध्ये नेहमी चौकीदार, सोशल डिस्टसिंग, सॅनिटाईझर, स्वच्छता असुन पैसे असतात तर स्टेट बॅंक व एक्सीस बॅंक, सेंटर बॅकेचे एटीएम मधुन काही वेळ व काही दिवस सोडले तर फक्त पैसे काढता येते.आणि युनियन बॅके सहीत बहुतेक बॅंकेचे एटीम मध्ये पैसे नसल्याने किंवा तांत्रिक कारणाने पैसे उपलब्धच नसतात. बॅके व्दारे खाते धारकांना कोणत्याही वेळी, कमी वेळात तत्पर सेवा देण्याच्या व बॅंकेचा कार्यभार कमी करण्याच्या सार्थ उद्देशाने एटीएम मशीन लावण्यात आल्या परंतु बॅंकेच्या दुर्लक्षतेने एटीएम मशीनची देखरेख करणारा चौकीदार नसणे, सोशल डिस्टसिंग, स्वच्छता, सॅनिटाईझेशन नसणे. पैसे नसणे यामुळे तत्पर सेवा तर सोडा अनाडी, वयोवृद खाते धारकांचे एटीएम मशीन मधुन अनोळखी व्यक्ती हातचालाकीने पैसे काढुन घेत खातेधारकांना आर्थिक नुकसान(भुर्दंड) पडतो आहे. या सर्व कारणाने कन्हान-कांद्री शहरातील बहुतेक एटीएम मशीन पांढरा हत्ती ठरत आहे.

कोरोना महामारी संकटकाळ असताना जर एटीएम सेवा व्यवस्थित बॅंका न पुरवित असल्याने संबधित विभागाने चौकसी करून दोषी बॅंकेवर कारवाई करावी. आणि सर्व सोयीयुक्त एटीएम सेवा नियमित देण्यास बॅंकेला बाध्य करून खातेधारक नागरिकांना न्याय देण्याची मागणी जोर धरत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

आम आदमी पार्टी कडून किसान विरोधी बिलाचा निषेध मोर्चा

Thu Sep 24 , 2020
*आज आम आदमी पार्टी कडून किसान विरोधी बिलाचा निषेध मोर्चा काळी पट्टी बाधुन तहसिल कार्यालय येथे पोहचला* कमलसिंह यादव पारशिवनी तालुका प्रीतानिधी पाराशिवनी (ता प्र) :- आम आदमी पार्टी, पारशिवनी तालुका/ जिल्हा नागपुर तर्फ आज आम आदमी पार्टी कडून किसान विरोधी बिलाचा निषेध मोर्चा काळी पट्टी बाधुन तहसिल कार्यालय येथे […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta