आमदारांचे आश्वासन हवेत तर पोलीस निरीक्षकांची कारवाई फजा : जनतेची ओरड

*आमदारांचे आश्वासन हवेत तर पोलीस निरीक्षकांनी कारवाई फजा

*तारसा रोड चौक ते चाचेर मार्गावरील जड वाहतुक बंद करा, अन्यथा आंदोलन

*नागरिकांचे कन्हान पोलीस प्रशासनाला निवेदन

*२७ तारखे नंतर तीर्व आंदोलन करु – राजेंद्र शेंदरे (नगरसेवक )


कन्हान – कन्हान तारसा रोड चौक ते गहुहिवरा चाचेर मार्गावरुन गेल्या काही दिवसान पासुन कोळसा,रेती चे ओव्हर लोड १४ चक्का, २०चक्का मोठ मोठे जड वाहतुक सुरु झाल्याने येथे मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढल्याने येथील स्थानिक नागरिकांनी आमदार आशिष जयस्वाल व पोलीस निरीक्षक विलास काळे यांना निवेदन देऊन तात्काळ जड वाहतुक बंद करण्याची मागणी केली होती परंतु जड वाहतुक बंद न झाल्याने स्थानिक नागरिकांनी पुन्हा एकदा कन्हान पोलीस स्टेशन चे गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यशवंत कदम यांना निवेदन देऊन तात्काळ जड वाहतुक बंद करण्याची मागणी केली अन्यथा तीर्व आंदोलन चा इशारा देण्यात आले आहे .

        कन्हान गहुहिवरा चाचेर मार्गावरुन येथील नागरिक सकाळ व सायंकाळ च्या सुमारास वाॅकिंग ला जात असतात व दिवसभर या महामार्ग वरुन नागरिकांचे येणे जाणे सुरु असते.अश्यातच कन्हान तारसा रोड चौक ते गहुहिवरा चाचेर मार्गावरुन गेल्या काही दिवसान पासुन कोळसा, रेती चे ओव्हर लोड १४ चक्का २० चक्का मोठ मोठे जड वाहतुक सुरु झाले आहे . परंतु दोन्ही मार्ग हे  १० ते १२ फुटाचे असुन या मार्गावरुन जड वाहनांची वाहतुक सुरु झाल्याने इतर वाहनांना , नागरिकांना येणे जाणे करिता चांगलाच त्रास सहन करावा लागत असुन मोठ्या अपघाताची भीती निर्माण झाली आहे . या जड वाहतूकी मुळे महामार्ग वर मोठ मोठे गड्डे निर्माण होऊन रस्ता खराब झाला आहे . या गंभीर विषया वर व जड वाहतुक बंद करण्या करिता कन्हान – पिपरी नगरपरिषद येथे दिनांक ८ सप्टेंबर ला सर्व साधारण सभा आयोजित करण्यात आली असुन या सभे मध्ये हा ठराव मंजुर करण्यात आला असुन कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्याने नागरिकांनी पुन्हा एकदा कन्हान पोलीस स्टेशन चे गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यशवंत कदम यांना निवेदन देऊन तात्काळ जड वाहतुक बंद करण्याची मागणी केली आहे अन्यथा तीर्व आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे .

*आमदारांचे आश्वासन हवेत , तर पोलीस निरीक्षकांनी कारवाई नाही केली*

कन्हान तारसा रोड चौक ते गहुहिवरा चाचेर मार्गावरुन जड वाहतुक बंद करण्याच्या मागणी करिता स्थानिक नागरिकांनी शुक्रवार दिनांक २७ आॅगस्ट २०२१ ला रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल यांना निवेदन देऊन जड वाहतुक बंद करण्याची मागणी केली असता आमदार आशिष जयस्वाल यांनी सात दिवसाचे आश्वासन दिले होते . परंतु खोटे सिद्ध झाल्याचे चित्र दिसुन येत असुन कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांनी नगर परिषद चे ठराव असणे आवश्यक आहे असे सांगितल्या नंतर कन्हान – पिपरी नगरपरिषद येथे बुधवार दिनांक ८ सप्टेंबर २०२१ ला या विषयावर सर्व साधारण सभा आयोजित करण्यात आली असुन या सभे मध्ये नप नगराध्यक्षा करुणा आष्टणकर , उपाध्यक्ष डायनल शेंडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सर्व नगरसेवक , नगरसेविका व आदिं च्या सर्वानुमते हा ठराव मंजुर करण्यात आला होता . त्यानंतर पोलीस निरीक्षक विलास काळे यांना जड वाहतुक बंद करण्याबाबत चा नगर परिषद येथील सर्वानुमते मंजुर झालेला ठरावाचा प्रस्ताव देण्यात आला आहे . जर २७ सप्टेंबर पर्यंत तारसा चौक ते गहुहिवरा चाचेर मार्गावरुन जात असलेले जड वाहतुक बंद नाही झाले तर तीर्व आंदोलन उभारण्यात येणार आहे अशी माहिती नगरसेवक राजेंद्र शेंदरे यांनी दिली आहे .

या प्रसंगी नगरसेवक राजेंद्र शेंदरे , मोहम्मद अली आजाद , श्रवण वतेकर , अजय लोंढे , शंकरराव कुंभलकर , नरेश सोनेकर , संजय रंगारी , दिपनकर गजभिए , सुरेश चावके , अभिजीत चांदुरकर , पारस नानवटकर , सुनिल रेवतकर , सागर नाटकर , संदीप पाहुणे सह आदि नागरिक उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान झालेल्या पावसाने राय नगर येथील घराची भिंत पडली

Fri Sep 24 , 2021
कन्हान झालेल्या पावसाने राय नगर येथील घराची भिंत पडली.  कन्हान : – पाच दिवसापासुन कन्हान शहरात झालेल्या पावसामुळे रायनगर कन्हान येथील स्व. विश्वनाथ जी रहाटे यांच्या घराची एकीकडची पुर्ण भिंत पडुन नुकसान झाले. कुठलिही जिवहानी झाली नाही.          शुक्रवार (दि.१७) सप्टेंबर पासुन या पाच दिवसा पासुन सुरू असले ल्या […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta